विदर्भ

कोरोना योद्ध्यांंचा सत्कार ववंदे मातरम देशभक्ती पर गीतांचा बहारदार गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध

*

विदर्भातील अभिरूचिसंपन्न व कलारसिक कल्पक व्यक्तीमत्व प्रदिप गुरूखुद्दे यांच्या सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन.

अकोला१६ ऑगस्ट:- *जेनेरिकार्ट मेडिसीन स्टोर चे आरोग्य मेडिकल प्रायोजक असलेल्या या बहारदार कार्यक्रमाला अकोला आर्ट सोसायटी, अकोला जिल्हा मुद्रक संघ, डवले काॅलेज अकोला यांचे सहकार्यातून वंदेमातरम हा देशभक्तीपर गीतांचा नजराना महानगरातील नागरिकांना पेश करण्यात आला.* कार्यक्रमाचे उदघाटन बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केले व त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम माणसातील देवमाणूस स्व.शिवशंकरभाऊ पाटील यांना अकोला जिल्हा मुद्रक संघाचे पदाधिरी दत्ता ठाकरे पाटील यांचे हस्ते हारार्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली व त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.
या कार्यक्रमाला मंचावर शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, काँग्रेस कमीटीचे पदाधिकारी डॉ सुभाषचंद्र कोरपे व हेमंत देशमुख, शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे, बबलू – अनिरुध्द देशमुख, अंनिसचे राष्ट्रीय सल्लागार शरद वानखडे, यशवंत सवाई, डॉ.संदीप चव्हाण, अनिल परचुरे, शिक्षक सेनेचे नरेंद्र लखाडे सर, प्रा.प्रकाश डवले सर, गजानन खेंडकर सर आदि मान्यवर उपस्थित होते. तदनंतर याप्रसंगी कोरोना च्या कठीण काळात सेवा देणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवाभावी कामांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं विविध मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळाजील समाजकार्य करणा-या 21 समाजसेवकांचा व संस्थेचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. या मध्ये गोेविंद गौसेवा प्रकल्पाचे गजानन बोराळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रशांत राजुरकर व आरोग्य सेवेक शैलेश पवार, कच्छी मेनन समाजाचे समाजसेवक जावेद जकारीया, संतगाडगेबाबा बचाव पथकाचे दिपक सदाफळे, सर्पमित्र बाळु काळणे, शिवाजी महाविद्यालयाचे टिमलिडर रोहण बंदेले, विपुल माने, शेषराव काळे, संगीता सुनवणे, निलीमा तिजारे, चंद्रकात झटाले, वाहतूक शाखेचे नारायण गंगाखेडकर , जनसत्याग्रह संघटनेचे प्रमुख फिरोज खान, डॉ.सुनिल चोधरी , मनोज यादव, शुभम इंगळे, प्रा.आनंदा काळे, डॉ ममता इंगोले, डॉ.संतोष मोरवाल, नितील निंबोळकार यांचा समावेश होता. सुप्रसिद्ध पाचनविकार तज्ञ काॅग्रेस नेते डाॅ. सुभाषभाऊ कोरपे, निवासी जिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, डवले स्कुल अन्ड काॅलेजचे प्राचार्य प्रकाश डवले सर, शिक्षक सेना विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.नरेंद्र लखाडे यांना सुद्धा आयोजकां तर्फे सन्मानित करण्यात आले. आयोजक प्रदिप गुरूखुद्दे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या अभिनव देशभक्तीपर उपक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रदिपभाऊ गुरूखुद्दे यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणाची आहुती देणार्या विरांचे स्मरण करून त्यांच्या चिरंतन स्मृतीला अभिवादन करत कोरोना काळात समर्पित भावनेने सेवाभावी व्यक्तींच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली व त्यांना प्रेरणा देण्याच्या हेतूने वंदेमातरम या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून शहीदांना अभिवादन केले. हेड पोष्ट ऑफीस समोर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे बहारदार संचालन डाॅ.प्रवीण देशमुख यांनी केले.तर गायक कलावंत राम भारती, आनंद जहागिरदार, वर्षा कडोळे, प्रदिप देशमुख, नंदकिशोर दाभाडे, हर्षवर्धन फुलझेले, अबुजर गौरवे, गौरव भारती व इतर गायक कलावंतांनी आपल्या सुमधूर, अप्रतिम देशभक्ती पर गीतांनी अकोलेकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सपत्नीक देशभक्ती गीत सादर करून कार्यक्रम अधिक बहारदार केला व रसिक श्रोत्यांची वाह वाह मिळविली.तसेच त्यांचे हस्ते कोरोना योध्यांचा, गायक कलावंतांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाला जेम चे संचालक अतुल आलेगांवकर, गार्डन साउड सव्र्हिसचे नूरा भाई गौरवे, अकोला अकोला वाहतूक निरीक्षक गजानन शेळके साहेब, जिल्हा मुद्रक संघाचे उपाध्यक्ष संतोष धरमकर यांचे विशेष सहकार्य लाभले. अकोला जिल्हा मुद्रक संघाचे पदाधिरी संतोष धरमकर, संदीप मोरे, आरीफ खान, आबारावे आमले, दत्ता पाटील, नागोराव लाटे, राजेंद्र देशमुख, मनोज नेमाडे, सचिन अहिर, शब्बीर मुन्नीवाले, राम सांगळे, रेणुका मिसाळ, पूनम चव्हाण, रोहिणी अरुळकर लियाकतअली मिरसाहेब, उर्दू शिक्षक संघटना अमरावती विभाग अध्यक्ष डाॅ. साबीर कमाल, विभागीय सचिव डाॅ.अतीक अहेमद यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.