विदर्भ

कोकण पुरग्रस्तांसाठी जीवानावश्यक साहित्यासह मूर्तिजापुरातील ध्येयवेडे तरूण रवाना

मूर्तिजापूर,ता.४ : कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मूर्तिजापुरातील ८ समाजसेवी युवक आज उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी नारळ फोडल्यानंतर जीवनावश्यक साहित्य घेऊन रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले.

कोकणात अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरात असंख्य गावे, शहरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णांशाने विस्कळीत झाले आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगी धान्य(डाळ-तांदूळ),तेल, ब्लँकेट, फिनाईल, बिस्कीट, गहू, आटा, पाणी बॉटल नवीन कपडे, इत्यादी जीवनावश्यक वस्तू स्वरुपातील मदत स्वइच्छेने संकलित करण्याचे आवाहन या युवकांनी नागरिकांना केले होते. ही सर्व मदत घेऊन संभाजी ब्रीगेडचे विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता यांच्या मार्गदर्शनात उज्वल ठाकरे, तेजस टापरे, तुषार बांबल, हर्षल जाधव, अयान शेख, सागर नवले, रवी गोयकर, शशिकांत सोळंके आज रवाना झाले. उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, संभाजी ब्रीगेडचे विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता, नगरसेवक सचिन देशमुख, लखन अरोरा, प्रा.प्रमोद ठाकरे, गजानन बोर्डे यांनी त्यांना शुभेच्छापर निरोप दिला.