राजकीय

केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर केलेली कारवाई योग्यच… पोलीस आयुक्त, दिपक पांडे 


नाशिक २५ऑगस्ट:-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे,केंद्रीय मंत्री राणे यांच्या वर नाशिक पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच,असल्याचं मत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी स्पष्ट केले आहे.नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात कारवाई करण्यासाठी घाई केली असून, नाशिक पोलिसांनी माझ्यावर दबावाखाली केल्याचा,राणे यांचा आरोप नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी फेटाळून लावला आहे.राणे यांच्या विरोधात झालेली कारवाई, ही कायदेशीरच आहे,हे सांगताना पोलीस आयुक्त यांनी, नाशिक पोलिसांकडे नारायण राणे यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंदवली गेली होती, त्या तक्रारीची पूर्णपणे शहानिशा करूनच, गुन्हा दाखल करण्यात आला.नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला होता. पण, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राणेंचे सर्व आरोप फेटाळून लावले.आमच्यावर कुठलाही दबाव नव्हता. आमच्याकडे लेखी तक्रार आली. ती योग्य असल्यामुळेच पुढील कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये आमच्यावर कुणाचाही दबाव नव्हता. अशा प्रकरणात पोलीस कुणाच्याही दबावाला बळी पडत नाही. कायदेशीर रित्या कारवाई केली जाते, याही प्रकरणात तीच आमची भूमिका होती, असं पांडे यांनी ठणकावून सांगितलं.नारायण राणे यांना २ तारखेंला हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यांना नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी यावे लागणार आहे. त्यामुळे ते एक जबाबदार नागरिक असून देशाचे केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे याचं ते पालन करतील. जर राणे हजर झाले नाहीतर त्यावेळी विचार करू, असंही दीपक पांडे यांनी सांगितलं.’राणेंच्या विरोधात तीन कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे. तक्रारदाराने जी तक्रार नोंदवली, त्यानुसार ती योग्य असल्याचे आमच्या निदर्शनास आहे. पोलीस आयुक्त दिपक पांडे यांना पोलीस खात्याचा २२वर्षाचा अनुभव असल्याच मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तो तसाच कायम राहणार आहे.गुन्हा दाखल करण्यासाठी नाशिक पोलिसांनी  अजिबात घाई केलेली नाही. उलट उशीराने गुन्हा दाखल झाला असता तर ,पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला गेला असता.अस मत पोलीस आयुक्त पांडे यांनी व्यक्त केलं.या केसची  पुढील सुनावणी ही १७ सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत त्यांनी उपस्थित राहायचे की नाही  हा राणे साहेबांचा  विषय आहे. तो कारवाई करणार नाही. आम्ही न्यायलायाच्या आदेशच पालन करणार आहोत. तसंच, राणेंच्या अटकेचा आदेश योग्यच होता आणि आमचा हेतू स्पष्ट होता. आम्ही तातडीने अॅक्शन घेणार नाही. नारायण राणे यांच्याविरोधात पूर्ण कायदेशीररित्या कारवाई योग्यच होती, असंही नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केलं