क्राईम

किसनराव हुंडिवाले हत्या प्रकरण, श्रीराम गावंडे यांचा जामीनअर्ज पुन्हा फेटाळला

.
अकोला प्रतिनिधी२०ऑगस्ट:- गवळी समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते किसनराव हुंडिवाले यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी श्रीराम गावंडे यांनी करोना संसर्गच्या पार्श्वभुमिवर जामीनसाठी तिसऱ्यांदा सादर केलेला जामीन अर्ज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित बी. देव यांनी दि १८ ऑगस्ट २०२१ रोजी फेटाळुन लावला.  यापुर्वी कोरोनाच्या कारणास्तव गांवडे यांनी जिल्हा न्यायालयात सादर केलेला जामीन अर्ज अकोला जिल्हा सत्रन्यायालयाने फेटाळला होता.त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली.परंतु उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळुन लावला. यापुर्वी २०१९ मधे श्रीराम गावंडे यांच्यातर्फे अँड.सुनिल मनोहर व अँड.यु.पी.धबाले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जामीनअर्ज दाखल केला होता. दोन्हीबाजूचा युक्तिवाद ऐकुण घेवुन, सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरीत तत्कालीन न्यायमूर्ती व्हि.एम.देशपांडे यांनी जामीनअर्ज फेटा़ळून लावत, पुढील एक वर्षापर्यंत जामीनअर्ज सादर करण्याला गावंडे यांना प्रतिबंधित केले होते.त्यानंतर २०२० मधे अँड.ए.एस.लोंधे यांनी करोना संसर्गाचा धोका असल्याच्या कारणास्तव गावंडेंतर्फे जामीनअर्ज दाखल केला होता.उभयपक्षाचा युक्तिवाद ऐकुन घेतल्यावर २३ जुलै २०२० रोजी विद्यमान न्यायमुर्तींनी हा अर्ज खारीज केला.पुन्हा २०२१ मधे तिस-यांदा व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर  दुस-यांदा जामीनसाठी याचिका दाखल केली होती .यावेळी व्हिडिओ काँन्फ्रसिंगने झालेल्या सुनावणीत गावंडे यांच्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ अँड.एस.पी.धर्माधिकारी व अँड. सी.एस.धर्माधिकारी यांनी तर सरकारच्या वतीने अँड.एन.पी.मेहता व अँड. अविनाश गुप्ता यांनी युक्तिवाद केला होता. दोन्हीबाजूचा युक्तिवाद पुर्ण झाल्यावर सरकारपक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधिक्ष विनय जोशी यांनी हा अर्ज २० एप्रिल २०२१ रोजी खारीज केला होता.दरम्यान संशयीत आरोपी धिरज गावंडे यांनी जामीनसाठी सादर केलेला अर्ज न्यायालयाने ख़ारिज करून, ६ महिन्यानंतर जामीनअर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले.या हत्याकांडाची थोडक्यात माहिती अशी आहे की,धर्मदाय आयुक्त कार्यालयात ६ मे २०१९ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास किसनराव हुंडीवाला यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्यात हुंडिवाला यांचा घटनास्थ़ळीच मृत्यु झाला. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने सर्व संशयीत आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.दरम्यान मुन्ना गावंडेसह १० जणांची जामीनवर सुटका झाली.सध्या श्रीराम गावंडे, रणजीत गांवडे, विक्रम उर्फ छोटू गांवडे,धिरज व सुरज गावंडे तुरूंगात आहेत.