क्राईम

काळ्या बाजारात विक्री साठी जाणारा लाखो रुपयांचा रेशनचा गहू आणि तांदुळासाठा जप्त! अकोला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!


अकोला प्रतिनिधी२३ऑगस्ट:-अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपयांचा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू आणि तांदुळाचा साठ्या सह ,हा माल वाहून नेणाऱ्या वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, हिवरखेड ते वारी रोडवरील बस स्थानक जवळ असलेल्या गोडाऊन मध्ये गोरगरीब जनतेला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या रेशनचा गहू आणि तांदूळचा साठा करून,तो साठा चढ्या भावानेविक्री साठी काळ्या बाजारात जात असल्याची माहिती, अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, त्या माहितीच्या आधारे हिवरखेड रोडवरील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या किशोर गुप्ता आणि त्याचा सहकारी सुरेश जगन्नाथ टावरी यांच्या गोडाऊनवर छापा टाकला असता, त्याठिकाणी शासनाच्या वतीने रेशन साठी वितरित केलेला २५०क्विंटल गहु आणि ,२७६क्विंटल ८५किलो तांदूळचा साठा असा एकुण१०लाख७१हजार९००रुपये किमतीचा धान्य साठा मिळून आला, तसेच याठिकाणी गहू आणि तांदुळाचे मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा,गहू आणि तांदूळ पोत्यात भरून, पोते शिवण्यासाठी शिलाई मशीन, तसेच गहू आणि तांदुळाचा साठ्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी४मालवाहू वाहने जप्त करण्यात आली,रेशनचा माल आणि ताब्यात घेण्यात आली, या कारवाईत एकूण४४लाख८हजार९००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत कौशल किशोर गुप्ता, वय४८वर्षे,रा.दर्यापूर रोड अकोट,जि. अकोला,सुरेश जगन्नाथ टावरी, वय६०वर्षे, रा.तुकईथळ, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश,अब्दुल मुजाहिद शेख अनोसोद्दीन रा.बेलखेड, ता.तेल्हारा जि.अकोला,मस्तानशहा मन्नानशहा, रा.चोहट्टा बाजार,साहिल खान रशीद खान, रा.तुकईथळ, मध्यप्रदेश,शहाबाजखान सनाउल्लाखान रा.हिवखेड, ता.तेल्हारा जि. अकोला यांच्या विरोधात जीवनाश्यक वस्तू अधिनियम कायद्याचे कलम३,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.