pawan_kheda
देश राजकीय

काँग्रेस नेते पवन खेडांच्या विरोधात गुन्हा दाखल

पंतप्रधानांच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तीक आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजप आमदार मुकेश शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवर दिल्लीतील हजरतगंज कोतवाली पोलिसात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

मुकेश शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवंगत वडील दामोदर दास मूलचंद मोदी यांच्यावर चुकीची टिप्पणी केली. नरेंद्र मोदींचे वडील नरेंद्र गौतम दास मोदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे आणि ते गौतम दास की दामोदर दास ? दामोदर दास हे नाव असले तरी त्यांची कृती गौतम दास सारखीच आहे” असे पवन खेडा म्हणाले होते.

अशा प्रकारे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पंतप्रधानांच्या दिवंगत वडिलांचा गौतम अदानी यांच्या वडिलांशी संबंध जोडून त्यांची जाणीवपूर्वक कुचेष्टा केली. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 153-ए, 500,504 आणि 505 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.