sonia-gandhi-kharge
राजकीय

काँग्रेसचे ८५वे अधिवेशन:काँग्रेसच्या घटनेत पाच मोठ्या दुरुस्त्या

मुंबई: छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसचं ८५वं अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनामधून एक मोठी बातमी पुढे आलीय. काँग्रेसच्या घटनेमध्ये पाच मोठ्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.

या पाच दुरुस्त्यांमध्ये आरक्षण, सदस्यत्व, एआयसीसी मेंबर, सीडब्ल्यूसी आणि संघटनेशी संबंधीत नियम बदलले आहेत. या माध्यमातून काँग्रेसने मोठी राजकीय खेळी केल्याचं निदर्शनास येतंय.पीसीसी आणि एआयसीसीमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे.

एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला ५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताम मंजूर करण्यात आला. तसेच आरक्षित आणि अनारक्षित जागांमध्ये ५० टक्के पदांवर महिला आणि ५० वर्षांखालील लोकांना संधी मिळणार आहे.काँग्रेसमध्ये आता फक्त डिजिटल सदस्य नोंदणी होणार आहे. तसेच सदस्यत्व नोंदणी करतांना आई आणि पत्नीचं नाव जोडावं लागणार आहे.

एक AICC सदस्यासाठी आता ६ पीसीसी प्रतिनिधी आवश्यक आहेत. पूर्वी ही संख्या आठ होती. तसेच एआयसीसी सदस्यांची संख्या १२४० वरुन १६५३ करण्यात आलेली आहे. आता CWC अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये २३+२ सदस्यांऐवजी ३५ सदस्य असतील.

यामध्ये ५० टक्के पदं ही एसटी, एससी, ओबीसी, युवक, महिला यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात येतील. पंतप्रधान, माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष, माजी अध्यक्ष, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य सीडब्ल्यूसीचे मेंबर असतीलहे पाच मोठे बदल काँग्रेसमध्ये करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अधिवेशनात खल झाला.