क्राईम

कथित पत्रकार मोहन पांडेवर खंडणीची गुन्हा दाखल!

अकोट प्रतिनिधी:-१२ऑगस्ट:-अकोट येथे तहसील कार्यलयात  मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेले निळकंठ परशराम नेमाडे यांना ५लाख रुपयांची खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली .अशा आशयाची तक्रार मंडळ अधिकारी नीलकंठ नेमाडे दिल्यावरून, मोहन पांडे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेले मंंडळ अधिकारी नीलकंठ परशराम नेमाडे,वय ५४वर्ष्षे,रा.गजानन नगर अकोट यांनी कथित पत्रकार मोहन पांडे याला, न्यूज पोर्टलवर माझ्या बद्दल बदनामी कारक बातमी का टाकली अशी विचारणा केली असता,मोहन पांडे याने,मी तुमच्या  विरोधात बातम्या प्रकाशित करू नये,असे वाटत असेेेल  तर,मला५लाख रुपये द्यावे लागतील, त्यानंतर तुमच्या विरोधात बातम्या विद्रोही मराठा पोर्टलवर प्रकाशित करणार नाही, त्यावर नीलकंठ नेमाडे यांनी वरुळ जऊळका येथील रहिवासी काशिनाथ महादेव हिंगणकर यांच्या हस्ते५०हजार रुपयांची रक्कम मोहन पांडे याला दिली असे,त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.त्यानंतर१०ऑगस्ट रोजी रात्री ९वाजता दरम्यान नीलकंठ नेमाडे हे अकोला नाका अकोट येथे उभे असताना, एक अनोळखी इसम त्यांच्या कडे येऊन उर्वरित४लाख ५०हजार रुपये घेण्यासाठी, मला मोहन पांडे यांनी पाठविले आहे.तो इसम एवढ्यावरच न थांबता त्याने मला त्या अनोळखी इसमाने माझे मोहन पांडे सोबत फोनवर बोलणे करून दिले,त्यावेळी मोहन पांडे याने पैसे दिले नाही तर तुझ्या विरुद्ध आणखी बदनामीकारक बातम्या विद्रोही मराठा पोर्टलवर प्रकाशित करण्याची धमकी दिली.तसेच मी पाठविलेल्या व्यक्ती कडे पैसे दिले नाही तर, जीवे मारण्याची धमकी दिली. असेही नीलकंठ नेमाडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी मोहन पांडे आणि त्याला सहकार्य करणाऱ्या अनोळखी इसमाविरुद्ध अकोट शहर पोलीस ठाण्यात कलम३८४,३८६,३८७व३४नुसार गुन्हा दाखल करुन, मोहन पांडे याला अटक केली आहे.पुढील तपास अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे हे करीत आहेत.