राजकीय

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

सर्वपक्षीय बैठीकीला निमंत्रित न केल्याबद्दल राज्यसरकार विरुद्ध रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराज

मुंबई दि. 28 – ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहे.त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत ही आपली भूमिका असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी व्यक्त केले.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत काल सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक राज्य सरकार तर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले. मात्र रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.राज्यसरकार तर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकांना रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण का दिले जात नाही याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवुन जाब विचारणार असल्याचे  रामदास आठवले यांनी कळविले आहे.