अर्थ

ऑफलाईन शिक्षणामुळे ऑनलाईन शिक्षण ‘क्रांती’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

लॉकडाऊनमध्ये जेंव्हा विदेशी गुंवणूकदारांनी कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तेंव्हा बायजुज ने जास्तीत जास्त लोकांना हायर करायला सुरुवात केली, मार्केटिंवरचा अतिरिक्त खर्च करायला सुरुवात केली. २०२१ मध्ये बायजुज ने २ हजार २५१ कोटी फक्त मार्केटिंगवर खर्च केले होते, ज्याचा उलट परिणाम कंपनीच्या ग्रोथवर झाला.

२०२१ च्या शेवटी कंपनीचा रेव्हेन्यू २ हजार ४२८ कोटी होता पण लॉस ४ हजार ५८८ कोटींचा झाला. थोडक्यात प्रॉफिटवरून कंपनीचं व्हॅल्युएशन ठरत नसतं तर कंपनीचा लॉस किती झाला यावर गुंतवणूकदारांचं लक्ष असतं आणि कंपनीचा लॉस गुंतवणूकदारांच्या लक्षात आली त्यामुळे गुंतवणूक, फंडिंग कमी झाली. अशी अनेक कारणांमुळे बायजुज कंपनी लॉस मध्ये गेली. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असताना अशा कंपन्यांमुळे मुलांना अभ्यासाची सवय टिकून राहिली. बायजुजच नाही तर अनेक एडटेक प्लॅटफॉर्मने विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास, त्यांचं ज्ञान सुधारण्यास मदत केली आहे.

बायजुजने ऑनलाईन शिक्षणव्यवस्थेत ‘क्रांती’ आणली असं आपण ऐकतच होतो. देशातले लाखो विध्यार्थी बायजुज वर शिकत होते. पण हळूहळू समजायला लागलं कि, बायजुज खरोखर किती मोठा पांढरा हत्ती आहे जो हत्ती लाखो विधार्थ्यांच्या पालकांना पाळावा लागतोय. एखादी कंपनी मार्केटमध्ये येते आणि अगदी कमी काळात प्रचंड हिट होते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बायजुज कोविड काळाच्या वेळी लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळं काही ठप्प पडलं होतं, तेंव्हा शाळा/कॉलेजस कसे चालतील ? असा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा बायजुज, वेदांतू, अनअकॅडमी अशा ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म्स आले…त्यात एकच नाव गरज होतं ते म्हणजे बायजुज…

बायजुजचा सुरुवातीपासूनच प्रवास पाहायचा झाल्यास मूळचे केरळचे असलेले बायजू रवींद्रन यांनी कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कंपनी स्थापन केली. २००६ ते २०११ पर्यंत त्यांच्या क्लासेसला विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आणि २०११ मध्ये त्यांनी Think & Learn स्टार्टअप लाँच केले. ही बायजूची मूळ कंपनी आहे. २०१५ मध्ये बायजुज अँप लाँच केलं आणि हेच अँप बायजूसाठी गेमचेंजर ठरलं कारण नेमक्या या काळात स्मार्टफोन, इंटरनेटचा युज वाढत होता. त्यात तर बायजुज एक ऑनलाईन फॉरमॅट मध्ये ट्युशन देणारी कंपनी आहे ज्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह

हे ऑनलाईन व्हिडीओ लेक्चर पुरवलं.

बायजुज कंपनी या ऍपद्वारे १२ वी पर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण वर्ग तसंच इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेत होते. त्यामुळेच बायजुज झपाट्याने फेमस होत गेलं. देशातले लाखो विध्यार्थी बायजुज वर शिकत होते. बायजुजने शिक्षणव्यवस्थेत ‘क्रांती’ आणली असं आपण ऐकतच होतो. पण हळूहळू समजायला लागलं कि, बायजुज खरोखर किती मोठा पांढरा हत्ती आहे जो हत्ती लाखो विधार्थ्यांच्या पालकांना पाळावा लागतोय. बायजूवरून लोकांचा विश्वास उडत चाललाय. पालकांच्या तशा तक्रारी वाढत आहेत. अगदी काल-कालपर्यंत भारतातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप कंपनी म्हणून बायजुज समोर होती तीच बायजुज कंपनी

Byjus-rise-and-fall

आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का ?

सुरुवातीला कंपनीने अॅपवर फ्री एज्युकेशनल व्हिडिओ दाखवले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रभावित झाले. मग व्हिडिओवर सब्सक्रिप्शन लावलं. अशा प्रकारे प्लॅटफॉर्मचा विस्तार झाला. तयामध्ये कंपनी प्रॉफिट मध्ये होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बायजुज ची ८०% पेक्षा जास्त कमाई टॅबलेट आणि मेमरी कार्डच्या विक्रीतूनच होते. इतकंच नाही बायजुज ऍपचे सध्या ६५ लाख पेड सबस्क्रायबर्स आहेत. त्यात बायजुज चे ५० हजार ते दीड लाख फीज असणारे कोर्सेस आहेत. त्यातून कंपनीला किती रेव्हेन्यू मिळत असेल. इतका कि बायजुजचे मालक बायजूज रवींद्रन

अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये सामील झाले..

काविड काळात लॉकडाऊन झाले त्यामुळे सर्व लोकांना घरात बसण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे नेमकं याच वेळेस बायजुज मार्च २०२० मध्ये अचानक लॉकडाउन लागल्यावर शिक्षणासाठी वरदान ठरले. बायुजमुळे शिक्षणक्षेत्रात ऑनलाईन प्रणाली रुजू झाली असे म्हटलं तर वावंग ठरणार नाही.

लॉकडाउनमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. शाळा बंद राहिल्याने नुकसान होत होतं. अशात शाळा ऑनलाईन फॉरमॅटमध्ये शिफ्ट झाल्या. ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेत भरभराट झाली. दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणाचं मार्केट दिवसेंदिवस वाढत होतं. लॉकडाऊनची तारीख जशी जशी वाढत होती तसं तसं बायजुजमुळे कोचिंगचा भाव वाढत गेला.
पण ऑनलाईन लेक्चर्सच्या मोड्यूलमुळे. बायजुजचा फुगा फुटला. ज्या कंपनीचं व्हॅल्युएशन २०२० मध्ये २२ बिलियन डॉलर होतं ती कंपनी लॉस मध्ये जाऊ लागली.

२०२० मध्ये बायजुज फक्त २३१ कोटींच्या लॉसमध्ये होती त्याच्या पुढच्याच वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये हा लॉस ४ हजार ५८८ कोटींच्या घरात गेला, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ पट जास्त लॉस झाला. ऑगस्ट २०२१ पर्यंत अनअकॅडेमीचं व्हॅल्युएशन ३.४४ अब्ज डॉलर्सवर गेलं होतं. फिजिक्स वाला या कंपनीचं मूल्य १.१ अब्ज डॉलर्स झालं होतं आणि या सर्वांना मागे टाकत बायजुज १७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं होतं. या तिन्ही कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाल्या मात्र भारतातली सगळ्यात जास्त मूल्याची स्टार्टअप कंपनी म्हणून बायजुजचच नाव होऊ लागलं.

कंपनी ड्रीम रन करत होती. कंपनी लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टॅब्लेट आणि मेमरी कार्ड विकून पैसे कमावते. कंपनीचं ब्रेकडाऊन होण्याची कारणं पाहताना सर्वात आधी हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे कि, भले बायजुज २०१५ पासून या क्षेत्रात असलं तरी त्याची हाईप कोरोनाकाळात खूप झाली.

पण लॉकडाऊन संपल्यानंतर ती कमी कमी होत गेली. कारण ऑफलाईन शिक्षण सुरु झाल्याने ऑनलाइन शिक्षणाच्या मागणीत घट झाली. लॉकडाऊन संपलं. जसं जसं आपण कोरोनातून सावरत होतो, पेशंट्सची संख्या कमी होत गेली, शाळा, कॉलेजस चालू होत होते, ऑफलाईन शिक्षण सुरु झालं तसं तसं बायजुज कंपनी लॉस मध्ये जात होती. मग बायजुजने ऑनलाईन कोचिंगवरून आपला मोर्चा ऑफलाईन शिकवणीकडे वळवला. मात्र ऑफलाईन पॅटर्न देखील तितकासा सक्सेसफुल झाला नाही.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी तर असे आरोप केले कि, बायजुने मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे फोन करून त्यांना धमकावत आहे की जर त्यांनी कोर्स घेतला नाही तर त्यांच्या पाल्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे आयोगाने कंपनीचे सीईओ बायजू रवींद्रन यांना चौकशीसाठी समन्स बजावल होतं.

उच्चभ्रू वर्गातील पालक खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवतात त्यामुळे ते बायजुज सारखे ऑप्शन निवडत नाहीत. कंपनीचा मेन टार्गेट ऑडियंस असतो ते मध्यम वर्गीय आणि कमी उत्पन्न गटातले पालक. बायजुजचे सेल्स एक्झिक्युटिव्ह कमी उत्पन्न असलेल्या मुलांच्या पालकांकडे जातात आणि त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त फीस भरण्यासाठी कन्व्हेन्स करतात.

इतकंच नाही तर अशा ग्राहकांना सापळ्यात अडकवण्यासाठी कंपनीकडून सक्सेस स्टोऱ्या शेअर केल्या जातात आणि यावर पालक विश्वास ठेवतात.

आपली मुलं वाढत्या स्पर्धेत टिकावीत, यशस्वी व्हावीत असं पर्सेप्शन बिल्ड केलं जातं. त्याचा परिणाम म्हणजे पालक परवडत नसूनही कर्ज काढून, आपले दागिने गहाण ठेवून बायजूकडून पॅकेज विकत घेतात.

कंपनी मुलांना खर्चिक कोर्समध्ये अपेक्षित अशा शैक्षणिक सुविधा देत नाही, ग्राहकांच्या तक्रारी देखील ऐकून घेत नाहीत. परिणामी हळूहळू हे पेड स्बस्क्राइबर्स कमी होत जातायेत. याचा मोठा फटका कंपनीला बसला. याशिवाय कंपनीची आर्थिक गणितं देखील बिघडली.