क्राईम

ऑन लाईन जुगार अड्ड्यावर, खदान पोलिसांची धाड

अकोला प्रतिनिधी१०सप्टेंबर:-अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, ऑन लाईन जुगार अड्ड्यावर खदान पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने८सप्टेंबर रोजी धाड टाकून, एका आरोपीला अटक करून ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील सिंधी कॅम्प मधील अब्दुल कलाम आझाद व्यापारी संकुल मधील एका गाळयात ऑन लाईन गेम”फन अँड जॉय”यावर ऑनलाइन वरली द्वारे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती खदान पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली त्यावरून नमूद ठिकाणी डीबी पथकाने धाड टाकली असता,त्या ठिकाणी संगणका द्वारे ऑन लाईन जुगार सुरू असल्याचे दिसून आल्याने,जुगार चालविणारा प्रकाश भीमराव इंगोले,रा.मोहगांव ता. जि. वाशिम याला अटक करण्यात आली. या कारवाईत रोख रक्कम,संगणक संच असा एकूण३९हजार८८०रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, प्रकाश इंगोले विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पो. हे.कॉ. सदाशिव मार्गे,राजेश वानखडे,धीरज वानखडे, श्रीकृष्ण भारती, विक्रांत अंभोरे यांनी केली.