मुंबई: अवकाळी पावसामुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकर्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मोठा आर्थिक फटका शेतकर्यांना बसला आहे. याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही पाहायला मिळत आहेत. अनेकदा या मुद्यावरुन सभागृह तहकूबही करण्यात आलेलं होतं.
सरकारच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरुही आहेत. मात्र, अशातच राज्यातील ३६ तहसीलदारांच्या बदल्या ाâरण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन देखील विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळं शेतकर्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार आणि इतर यंत्रणावरती आहे. अशातच ३६ तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. अचानक बदल्या केल्यामुळं शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय.
दरम्यान, कालच विधनसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (९ मार्च) विधानसभेत २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज २९३ अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावरुन देखील आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच कांदा प्रश्न आणि अवकाळी पाऊस या दोन्ही मुद्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तीन तहसीलदारांच्या बदल्या
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच राज्यातील ३६तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी रात्री जारी केले आहेत.यामध्येअकोला जिल्ह्यातील तीन तहसीलदारांचा समावेश आहे. बाळापूरचे तहसीलदार डी. एल. मुकुंदे यांची बदली नांदुरा, जि. बुलडाणा येथे, पातूरच तहसीलदार दीपक बाजड यांची बदली बार्शीटाकळी येथे तर बार्शीटाकळीचे तहसीलदारगजानन हामंद यांची बदली मानोरा जि. वाशीम येथील तहसीलदारपदी करण्यात आली आह