world-nurse-day
लेख

एकासाठी काळजी करणे म्हणजे प्रेम, सगळ्यांसाठी काळजी करणे म्हणजे नर्सिंग

दरवर्षी संपूर्ण जगात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते रुग्णालयातून उपचार मुक्त किंवा बरा होईपर्यंत रुग्णसेवेत परिचारिकेची भूमिका ही फार महत्वाची असते.

रुग्ण सेवा करताना परिचारिका स्वतःचे सुख दुःखाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा करीत असतात. रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम परिचारिका करीत असतात. दरवर्षी ६ मे ते १२ मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो.

परिचारिका म्हणजे काय? जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्याची देखभाल संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजेच परिचारिका होय. नर्सिंग हा आरोग्य सेवेचा एक महत्वाचा कणा आहे. नर्सिंग हे एक वैद्यक शास्त्र व रुग्णसेवेची आघाडी ची शाखा आहे. डॉक्टर व रुग्ण यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे नर्स होय.

१२ में या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. दरवर्षी एक थीम या कार्यक्रमासाठी देण्यात येते यावर्षी  ‘ Nurses :A Voice to Lead – Invest in Nursing And Respect right to Secure global health’ ”म्हणजेच जागतिक आरोग्य सुरक्षित करण्यासाठी नरसिंग मध्ये गुंतवणूक आणि अधिकारांचा आदर करण्यासाठी परिचारिकांचा सन्मान आदर करा.’

nurse-day

या वर्षाच्या थीमनुसार जर नर्सिंग क्षेत्राला तसेच या विभागाचे कार्य उंचावण्यासाठी असून विभागात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे . या करता शासनाने या क्षेत्राकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त नर्सेस प्रशिक्षित कशाप्रकारे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच समाजात नर्सेस सन्मान तसेच सुरक्षा मिळाली पाहिजे याकडेही शासनाने चांगल्या प्रकारे लक्ष दिले पाहिजे . तसेच नर्सिंग क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करून त्यावर संशोधन करणे हे काळाची गरज आहे.

अशाप्रकारे तज्ञ परिचारिका प्रशिक्षित जर झाल्या तर यामुळे संपूर्ण जगात चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देण्याचे कार्य आणि समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे कार्य यशस्वीरीत्या करता येईल. जन्म आणि मृत्यू हे मानवाच्या आयुष्याचे निसर्गचक्र असले तरी आपण जन्मल्यानंतर घेतलेला पहिला श्वास व आपल्या मृत्यूचा वेळी घेतलेला शेवटचा श्वास याचे साक्षीदार असलेल्या परिचारिकेला आपण कधीच लक्षात ठेवत नाही किंवा आपणास त्याची जाणीव सुद्धा नसते.

Nurse Day

गेल्या दोन-तीन वर्षापासून कोवीड महामारी ने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या परिस्थितीत मानव आपले माणूसपण हरवून गेला होता. कोणत्याही कुटुंबातील जर एखाद्या व्यक्ती कोविड ने दवाखान्यात ?डमिट झाला असेल तर त्याला एकदा ?डमिट केल्यानंतर कुटुंबातील लोक त्या व्यक्तीस भेटावयास तसेच त्याची देखभाल करण्यास येत नसत. तेव्हा तो रुग्ण मानसिकरीत्या खचून जात होता . अशा वेळेस एकच व्यक्ती होती जी त्या रुग्णाच्या सोबत होती ती म्हणजे परिचारिका.

 

आपल्या जीवाची पर्वा न करता कोविडग्रस्त असलेल्या रुग्णांची देखभाल करून त्यांना डॉक्टरांनी सुचवलेले औषध उपचार देऊन त्याची जेवणाचे देखभाल करणे तसेच त्याला मानसिक आधार देण्याचे मोलाचे काम परिचारिकेने केले आहे, हे आपणास नाकारता येणार नाही. कोविड सारख्या गंभीर परिस्थितीत सुद्धा २४ तास दिवसरात्र राबून या परिचारिकेने असंख्य रुग्णांचे प्राण वाचवले आहे. तसेच त्यांना मानसिक आधार देऊन त्यांना उपचार मुक्त केले आहे. प्रसंगी काही परिचारिका या कोविंड ने ग्रस्त झाल्या तरीही लवकरात लवकर उपचार घेऊन बरे झाल्यावर आपल्या कर्तव्यात परत लढण्यासाठी हजर झाल्या.

सैनिक सीमेवर बाहेरील शत्रू पासून आपल्या देशाचे रक्षण करीत होते त्याचप्रमाणे आपल्या देशावर कोविड चे महाभयंकर आक्रमण झाले होते आणि या शत्रुंपासून आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आपले सर्व आरोग्य कर्मचारी व परिचारिका या आपल्या जीवाची तसेच आपल्या कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी रुग्णसेवा तसेच देशसेवा केली आहे. तसेच यामुळे काही आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांचे या आजराने काम करता करता निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा सर्व आरोग्य कर्मचारी व परिचारिका तसेच डॉक्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणे हे आपले कर्तव्य आहे. रुग्णांना प्रत्येक वेळेस सेवा देणारी व त्यांची काळजी घेणारी ही स्त्री परिचारिका असते.

परिचारिका ही वैद्यकीय सेवेचा महत्वाचा दूवा आहे . परिचारिकेला सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला समजून घेणे आवश्यक आहे. परिचारिका हा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आणि परिचारिका आपले काम यशस्वीरित्या पूर्ण करीत आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आज जर आपण पाहिले तर प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकेची संख्या ही मंजूर पदापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रुग्णालयात काम करताना परिचारिकेच्या रिक्त पदा अभावी सर्व परिचारिकांना कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

Nurse Day

काही परिचारिकांना १२ ते १८ तास काम करावे लागत असून त्यामुळे त्यांच्यावर मानसिक तसेच शारीरिक परिणाम होत आहे. त्यांना कामाचा अतिरिक्त ताण यामुळे मोठ्याप्रमानावर परिचारिकांना हायपर टेन्शन ,शुगर, मानसिक ताण तणाव तसेच इतर आरोग्य समस्यांनी ग्रस्त झालेल्या आहेत. तरीही आपल्या परिचारिका कशाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहे. कधीही आपल्या चेहर्‍यावर कोणतेही दुःख न दाखवता हसर्‍या चेहर्‍याने रुग्णांची सेवा करीत आहे.

रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांना सेवा देण्यासाठी असलेल्या परिचारिकांची संख्या ही अतिशय कमी असल्यामुळे परिचारिका तसेच आरोग्य कर्मचारी यांचा वर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ताण पडत आहे म्हणून आरोग्य विभागातील सर्व पदे भरली गेली तर आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांच्यावर होणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी होईल व रुग्णसेवा ही चांगल्या प्रकारे देता येईल. तसेच शासनाने आता रुग्णालयाचे खाजगीकरण करण्यास सुरुवात केली असून खाजगी तत्त्वावर कंत्राटी स्वरूपात आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांची पदे भरण्यात येत आहे यामुळे एक प्रकारे परीचारिकवर वर अन्याय होत आहे .

हे खाजगीकरण बंद होऊन सरळसेवेद्वारे सर्व आरोग्य विभागातील परिचारिका किंवा इतर तत्सम पदे कायम स्वरूपी भरण्यात यावी जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल व कोणावरही अन्याय होणार नाही व चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देण्यात येईल. आज मी एक परिचारिका आहे याचा मला अभिमान आहे आणि माझ्या सर्व परिचारिका भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.