Zumba-akola
अकोला

एकापेक्षा एक गाण्यांच्या तालावर झुंबा करत सार्वजनिक आरोग्य जागृतीचा संदेश!

अकोला : ’जीन’ सिमरन कटारिया यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय महिला दिन, होळी मिलन आणि झुंबा क्लासची तपपुर्ती या पृष्ठभुमीवर एकापेक्षा एक गाण्यांच्या तालावर झुंबा करीत सार्वजनिक आरोग्य जागृतीचा संदेश देण्यात आला. स्थानिक खंडेलवाल भवनात शनिवारी आयोजित होळी मिलन कार्यक्रमाला पुष्पा खंडेलवाल, अर्चना शर्मा, कांता अलीमचंदानी, गीता कटारिया, डॉ. सुषमा पारदासनी, सौम्या पाहुजा, निर्मला बन्सल यांच्यासह सिमरन कटारिया, साक्षी बाछूका आणि किरण हिरानंदानी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत सिमरन कटारिया व साक्षी बाछूका यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांनी एकापेक्षा एक गाण्यांच्या तालावर ’झुंबा’ करत सार्वजनिक आरोग्य जागृतीचा संदेश दिला. यावेळी कष्टकरी महिलांचा ट्रॉफी शाल व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानित महिलांमध्ये अपूर्व ओहल, वर्षा जामनिक सीमा मुळे, किरण हिरानंदानी, कीर्ती मिश्रा आणि आकाशवाणी निवेदिका डॉ. निशाली पंचगम यांचा समावेश होता.

यावेळी या महिलांची यशोगाथा ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली, कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती यासह अनेक विषयांवर आपली मते मांडली आणि आयोजक सिमरन कटारिया यांनी ’ महिला सौम्य असल्या तरी कमकुवत नसल्याचे सांगितले.

आयोजक सिमरन कटारिया,साक्षी बाछूका यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या उत्साहात होळी खेळण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.निशाली पंचगम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साक्षी बाछूका यांच्यासह झुंबा वर्गातील महिलांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध महिला मंडळांच्या महिला, निरंकारी भवन महिला, अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका व त्यांची टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.