अकोला

एकदिवसीय शैक्षणिक चिंतन व कार्यप्रेरणा शिबिर!

अकोला : श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा एक दिवसीय शैक्षणिक चिंतन व कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन.श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील वसंत सभागृह येथे आज ११ मार्च २०२३ रोजी शैक्षणिक चिंतन व कार्य प्रेरणा शिबिराचे आयोजन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारे करण्यात आले होते.

या एक दिवशी शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजाननराव पुंडकर हे होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुकररावजी रोडे, शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संजीवकुमार खाडे शाळा तपासणी अधिकारी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती प्रकाश अंधारे, शाळा तपासणी अधिकारी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती तसेच आनंद साधू प्राचार्य तथा सचिव महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अकोला. डॉ. अंबादास कुलट प्राचार्य, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला, विजय ठोकळ मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, अकोला तसेच अकोला, वाशिम, नांदुरा येथील शिव परिवारातील सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षिका हे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, आई सावित्रीबाई फुले, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन अ‍ॅड. गजाननराव पुंडकर व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत संस्थेतील सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी केले.

त्यानंतर सहाय्यक शिक्षिका सौ शुभांगी गावंडे मॅडम यांनी इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेचे सामुदायिक गायन केले. यानंतर संजीवकुमार खाडे शाळा तपासणी अधिकारी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी शिक्षकांना र्‍Aए २०२० , इयत्ता दहावी रिझल्ट, राष्ट्रीय संपदणूक सर्वेक्षण चाचणी रिझल्ट, प्रश्न निर्मिती, मातृभाषेचे महत्त्व, प्रश्नांचे महत्त्व, अध्ययन निष्पत्ती, प्रात्यक्षिक अनुभव देणे या सर्व बाबींवर शिक्षकांना विस्तृत असे सांख्यिकीय माहितीच्या आधारे मार्गदर्शन केले.