क्राईम

एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीचा खून!

चंद्रपूर शहरातील हृदयद्रावक घटना, तीन तासात आरोपीला अटक!

चंद्रपूर१०सप्टेंबर:-चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरूणाने,एकतर्फी प्रेमातून,ज्या तरुणीवर हा तरुण प्रेम करीत होता, त्या तरुणीचा भररस्त्यात खून करण्याची घटना९सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस अगोदर, घडलेल्या चंद्रपूर शहरातील हृदयद्रावक घटनेतील आरोपीला पोलिसांनी तीन तासाच्या आत अटक केली.याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,चंद्रपूर येथील एक तरुण, त्याच्या ओळखीच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करीत होता.परंतु तरुणीने प्रेमाचा नकार दिल्याने,या माथेफिरूने भररस्त्यात त्या तरुणीवर धारदार शास्त्राने सपासप वार केले,यानंतर आसपासच्या लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पीडित मुलीचे अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. हल्ला केल्यानंतर या मार्गावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी पळून जाताना आढळला आहे. या थरारक घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा संबंधित तरुणीचा ओळखीचा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित आरोपी मागील काही दिवसांपासून पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण पीडित तरुणीनं त्याला नकार दिल्यानं त्यानं तरुणीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अवघ्या तीन तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित तरुणीची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत