अकोला

एकच मिशन जुनी पेन्शन आंदोलनात माझोडचा छोटा तनिश सहभागी

माझोड : एकच मिशन जुनी पेन्शन या आंदोलनात मूळ माझोड गावातील छोटा तनिश खंडारे हा सहभागी झाला असून त्याच्या डोक्यावर एकच मिशन, जुनी पेन्शन हा फलक घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य, प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे हे आंदोलन १४ ‘मार्च रोजी करण्यात आले. नवीन पेन्शन बंद करून जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, या करीता राज्यव्यापी आंदोलनात मूळ माझोड गावातील आदिवासी विकास विभागाचे कार्यालय अधीक्षक योगेश खंडारे, याच कार्यालयात कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी जयश्री मांडवे खंडारे ह्या सहभागी झाल्या, त्यांच्या सोबत मात्र त्यांचा छोटा मुलगाही सहभागी झाल्याने या आंदोलनाचा फोटो व्हायरल झाला आहे.

या आंदोलनात आंबेगाव तहसीलदार रमा जोशी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रकल्प स्तरीय अध्यक्ष सागर शिंदे, कार्यालय अधीक्षक योगेश खंडारे, जयश्री मांडवे खंडारे, तनिष खंडारे, नवनाथ भवारी, समीर सरतापे, राजेश म्हस्के, आदींसमवेत इतर कर्मचारी उपस्थित होते.