गंगटोक, 19 फेब्रुवारी : उद्योगामध्ये दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी आपल्या उत्पादनांच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेवर आणि युएसपी कायम राखण्यावर आणि सरकारवरील आपले अवलंबित्व कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
ते शनिवारी सिक्कीममध्ये माझितर इथे, सिक्कीम मणिपाल तंत्रज्ञान संस्थेमधील स्टार्टअपचे संस्थापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
भारतातील एलईडी बल्ब उद्योग 2014 पूर्वी वर्षाला 6 लाख युनिट्सची विक्री करत होता आणि अनुदान काढून टाकल्यावर या उद्योगाचा विस्तार होऊन, तो दिवसाला 6 लाख युनिट्सची विक्री करू लागला.
त्याशिवाय प्रति युनिट उत्पादन खर्चात कमालीची घट झाली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हे उदाहरण देऊन, त्यांनी उद्योजकांना उत्पादनाच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.