अकोला: सामाजिक व मानवीय सेवेत सदा कार्य करणार्या इनरव्हील क्लब ऑफ अकोला ने ५१ गरजू रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले. दमानी नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने सेवाभावी देवानंद पाटील यांच्या माध्यमातून दिग्रस येथील सोपीनाथ महाराज यात्रेत पाच दिवसीय नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरात ५१ नेत्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. या गरजू ५१ नेत्र रुग्णांची इनरव्हील क्लब ऑफ अकोला ने मोफत शस्त्रक्रिया केली.
इनरव्हील क्लब ऑफ अकोलाच्या अध्यक्ष नसीम वाघ, इनरव्हीलच्या माजी प्रांत अध्यक्ष आशा मालीवाल, माजी प्रांत अध्यक्ष वैजयंती पाठक, शहनाज तारापूरवाला, समीना नजमी, अलका मेहता,वैशाली धारीवाल, टीना ओबेराय आदीं पदाधिकारीच्या उपस्थितीत या उपक्रमात सभापती शुक्ल, डॉ मनीष हर्षे व दमानी नेत्र रुग्णालयाच्या समस्त वैद्यकीय वर्गाने सहकार्य केले.