अकोला : स्थानिक इकरा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा हमजा अकोला या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले.
सर्व प्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना. किरणराव सरनाईक (आमदार विधान परिषद सदस्य) यांचे शुभहस्ते रिबीन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ सैय्यद इसहाक राही सर (ण्Eध् शाहबाबू एज्युकेशन सोसायटी पातूर) होते. मंचावर उपस्थत प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मोहम्मद जमील साहेब (उपाध्यक्ष इकरा उर्दू स्कुल अकोला), नकीर अहमद खान (माजी नगरसेवक अकोला), मोहम्मद कलीम (सुफ्फा इंटरनॅशनल हज टुर्स अकोला), मोहम्मद अजीम फलाही साहेब (इकरा हज टुर्स अकोला), श्री मोहम्मद फारुक साहेब (अध्यक्ष दाता माय. एज्यु. सोसायटी, अकोला), शकील अहेमद खान साहेब (ण्Eध् रहबर ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन्स अकोला), मोहम्मद कबीर मोहसीन साहेब (अध्यक्ष अल हिलाल एज्यु. सोसायटी रिसोड), परविन जैन सर (अध्यक्ष, पद्?माताई इंग्लिश स्कुल आलेगांव), श्री प्रमोद काळपांडे सर, श्री मोहम्मद जाकीर मोहम्मद कासम (ण्Eध् इकरा उर्दू शाळा अकोला), अकबर अली खान उर्फ एजाज सर (मुख्याध्यापक नैमत बेगम उर्दू हायस्कुल, अकोला) मोहम्मद सादीक (फॅन्सी बॅग हाऊस अकोला), डॉ. अब्दुल राजीक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सदफ नाज सै. जावेद यांनी तिलावत कुरआन ए पाक ने केली व मिस्बाह नाज यांनी तरजुमा सादर केला. फातेमा अन्ड ग्रुप ने खुदा तो वे है हमद सादर केला. उमायमा युसरा यांनी तालीम निसवा क्यु और कैसे या विषयावर तकरिर सादर केली. या नंतर दुआ ये मत कहो खुदा से मेरी मुशकीलें बडी है आयश अन्ड ग्रुप ने सादर केले. तहरीम् अन्ड ग्रुप ने नात ए पाक जमाने भर में ढुंडा मोहम्मद सा नहीं कोई सादर केले.
उरुश अनाबीया यांनी नमाज की अहमीयत या विषयावर तकरिर केली. बेटी तो रहमत है नजम मारीया अन्ड ग्रुप ने सादर केले. मसीरा फातेमा यांनी अगर मोबाईल फोन ना होता तकरिर सादर केले. या नंतर उस्ताद का अहतराम तकरिर नशरा मेहरीन यांनी सादर केले. सदफ ऑड ग्रुप यांनी ये इकरा स्कुल हमारा गीत सादर केले. एैशाज अन्ड ग्रुप यांनी स्कुल चले हम परफॉर्म केले. उजैफा अन्ड ग्रुप यांनी वंडर साँग सादर केले.
आओ दुनिया को बतलाए हम एक जिंदा कौम है। फैजान अन्ड ग्रुप ने गीत सादर केले. जवेरीया अॅन्ड ग्रुप ने मुस्लीम कौम की बेटी हुँ गीत सादर केले. इतर विद्यार्थ्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना. अड. किरणराव सरनाईक साहेब व शिक्षण तज्ञ मा. सैय्यद इसहाक राही सर (ण्Eध् शाहबाबु एज्युकेशन सोसायटी पातूर) इतर प्रमुख अतिथी यांनी आपले महत्वपूर्ण मार्गदर्शन करतांना म्हटले की, असे सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होर्यास चांगली मदत मिळते.
या कार्यक्रमात पालक गण भारी संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जुनेद खान जफर खान सर ने तर आभार प्रदर्शन मो. मोहसीन सर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मोहम्मद जाकीर मोहम्मद कासम (ण्Eध् इकरा उर्दू माध्यमिक शाळा अकोला), मुख्याध्यापक प्राथमिक व माध्यमिक शाळा यांचे नेतृत्व सर्व प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.