अकोला

आलेगाव वनपरिक्षेत्रात अजुन एका बिबट्याचा मृत्यू!

शरिरावरील जखमांचे इन्फेक्शन झाल्याने मुत्यु

वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर.

पातुर 12ऑक्टोबर :– तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत एका बिपट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली सदर बिबट्याचा मृत्यू हा त्याच्या अंगावर असलेल्या जखमा मधील इन्फेक्शन मुळे झाला असल्याचे समोर आले आहे.

परंतु या बिबट्याच्या अंगावर जखमा का झाल्या हा तपासाचा भाग असून तालुक्यातील बिबट्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना असताना सुद्धा वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मूग गिळून का बसले आहेत.

याबाबत तालुक्यात चर्चा रंगत आहेत. आलेगाव वनपरिक्षेत्रात ८ ऑक्टोंबर रोजी जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याला बुलढाणा व अकोला वन विभागाने रेस्क्यू करून जेरबंद केले व उपचारासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नेण्यात आले.

उपचारा दरम्यान ९ ऑक्टोंबर रोजी बिबट्याचा मृत्यू झाला, मृत्यूचे उत्तरीय तपासणी केली असता, चक्क बिबट्याच्या शरीरावर जखमा असल्याचे समोर आले.

आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत राहेर परिसरात या बिबट्याने एका इसमावर हल्ला चढविला होता , सदर माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन बिबट्याचा धुमाकूळ बघितला.

त्याच वेळी सदर बिबट्याचा धुमाकूळ पाहून ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली, वन विभागाकडून रेस्क्यू करून बिबट्याला जेरबंद करून उपचारासाठी विद्यापीठात नेण्यात आले, अखेर उपचार दरम्यान ९ ऑक्टोंबर रोजी बिबट्याचा मृत्यू झाला.

बिबट्याचा मृत्यू हा त्याच्यावर अंगावर असलेल्या जखमांचे शरीरामध्ये इन्फेक्शन झाल्याने झाला असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे, यामुळे या भागात बिबट्यांची शिकार करून त्याच्या अवयाची विल्हेवाट लावणारी टोळी सक्रिय आहे का हे शोधण्याची वनविभागाला गरज आहे.

यापूर्वी सुद्धा सावरगाव परिसरात एका बिबट्या मृत्यू झाला होता या बिबट्याच्या अवयवाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुद्धा त्यावेळी करण्यात आला होता.

यानंतर आलेगाव वनपरिक्षेत्र भागात पुन्हा एकदा बिबट्याचा मृत्यू झाल्याने या भागात बिबट्याची किंवा वन्य प्राण्यांची हत्या करून त्याचे अवयवाची विल्हेवाट लावणारी टोळी सक्रिय आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे परंतु आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निष्काळजी पणामुळे वन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा मुजोर अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याकरिता योग्य तपास करून योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याची पातुर तालुक्यात बोलल्या जात आहे.

उत्तरीय तपासणी अहवालानुसार बिबट्याच्या शरीरावर जखमा होत्या जखमा चे शरिरात इन्फेक्शन झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर येत आहे. डॉ. मोहन राऊत, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना आलेगाव