Signs of escalating corruption case in Alegaon forest area
अमरावती

आलेगाव वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचार प्रकरण चिघळण्याचे संकेत

अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण प्रारंभ

अमरावती : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरीक्षेत्र अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी यापूर्वी तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे तीन नागरिकांनी अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ केले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

Signs of escalating corruption case in Alegaon forest area

याबाबत सविस्तर प्राप्त माहिती अशी की काही दिवसांपूर्वी मंगेश इंगळे रा. दिग्रस खुर्द, निलेश सोनोने, पंजाबराव देवकते रा. पांढुर्णा रमेश कदम रा सोनुना यांनी उपवनसंरक्षक अकोला आणि मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी अमरावती येथे मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आपण उपोषण प्रारंभ केले.

Signs of escalating corruption case in Alegaon forest area

उपोषणकर्त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते की आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पांढुर्णा ते सोनूना रस्ता करताना वनविभागाची तीन मीटरची परवानगी असताना प्रत्यक्षात नऊ तर कोठे बारा मीटर पर्यंतचे खोदकाम करण्यात आले. या खोदकामामध्ये अडसर ठरणाऱ्या 28 झाडांची परवानगी असताना शेकडो सागवान झाडांसह आडजात झाडांची सुद्धा पोकलँडच्या सहाय्याने कत्तल करण्यात आली. तसेच आलेगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत खोदकाम करत असताना दहा हजार ब्रास मुरूमाची चोरी कंत्राटदाराने केली. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Signs of escalating corruption case in Alegaon forest area

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षक यांचे कंत्राटदाराशी संगणमत असल्याने या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारी करण्यात आल्या तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना जाग आली. परंतु दोन पोकलेन, एक जेसीबी आणि वीस ते पंचवीस ट्रॅक्टर यांचे चालक-मालक व कंत्राटदारावर अद्यापही कारवाई करण्यात आलेले नाही.

Signs of escalating corruption case in Alegaon forest area

त्यामुळे या सर्व प्रकरणात संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी निलेश सोनोने, पंजाबराव देवकते रा. पांढुर्णा व रमेश कदम पोलीस पाटील सोनुना यांनी अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ केले आहे. आता या प्रकरणात काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पांढुर्णा – सोनुना प्रकरणामध्ये उपवनसंरक्षक अकोला यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्या नंतर नियमांनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल. – जी के अनारसे, मुख्य वनसंरक्षक प्रा,अमरावती…