राजकीय

आलेगाव ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांना अतिक्रमण भोवनार ? अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार

पातूर१०सप्टेंबर- अकोला जिल्ह्यात येत असलेल्या,पातुर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलेगाव ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांविरुद्ध अतिक्रमण केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीवरुन सहा ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे समजते.याबाबत प्राप्त माहिती अशी की आलेगाव ग्रामपंचायतची निवडणूक सन 2020-21 मध्ये पार पडली. या निवडणुकीत निवडून आलेल्या,मोहम्मद आसिफ मोहम्मद गालिब, मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सादिक, इशरत अंजुम अमजद खान, उमा धम्मशील तेलगोटे ,अमर दिलीप तेलगोटे, संजय मन्साराम गावंडे या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार बबन काळदाते,भारत चिकटे यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केली आहे. या तक्रारी नंतर चौकशीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेअंती आता आलेगाव ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांना अतिक्रमण केलेले भोवणार असल्याचे समजते.या प्रकरणी बबन काळदाते यांनी मोहम्मद आसिफ मोहम्मद गालिब, मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सादिक, इशरत अंजुम अमजद खान, उमा धम्मशील तेलगोटे ,अमर दिलीप तेलगोटे,यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला तर भारत चिकटे यांनी ग्रामपंचायत सदस्य संजय मन्साराम गावंडे यांच्या विरुद्ध अर्ज दाखल केला त्यामुळे सदस्यांचे सदस्यत्व टांगणीला लागलेले आहे. ग्रामपंचायत सदस्याने अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे सहा सदस्य अपात्र होतात की काय याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.आम्ही कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण केले नसून सर्व आरोप बीन बुड़ाचे आहेत आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल:-मो आसिफ मो गालिब,ग्राम पंचायत सदस्य आलेगाव