अकोला

आर्थिक विवंचनेत शेतकरी पुत्राने केली विष प्राशन करून आत्महत्या!

अकोट : सात ते आठ महिने आधी अपघातात बहिण जावयाचे निधन त्यानंतर वडिलांचे निधन पुन्हा बहिणीचे लग्न अशा आर्थिक विवंचनेत स्वतःला मनस्ताप करून एका २९ वर्षीय विवाहित तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १७ मार्चला दुपारी दरम्यान घडली अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील माजी सरपंच ज्योतिमाला भगवान सरकटे यांचा मुलगा उमेश भगवान सरकटे या २९ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात घरी कुणी नसताना विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.

उमेश यास तत्पूर्वी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तब्बल तीन दिवसाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर त्यांनी उपचाराला साथ दिली नाही, अखेर चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. उमेश हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या आईने सहा वर्षांपूर्वी मुंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून पाच वर्षे कार्यभार पाहला दोन वर्षांपूर्वी जावयाचे अपघातात निधन झाले त्यानंतर अल्पशा आजाराने पतीचे निधन व आता विष प्राशन करून पुत्राने केलेली आत्महत्या असा दुर्दैवी प्रकार सरकटे परिवारात घडला.

उमेश याच्यामागे आता पत्नी विवाहित बहीण व आई असा परिवार आहे. त्याच्याकडे चार एकर शेती असून सततची नापिकी व कुटुंबावर झालेले आघात खाजगी व बँकेचे असलेले कर्ज अशा विवंचनेत त्याने मृत्यूला जवळ केले. त्याच्यावर आज दुपारी मुंडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.