Art-of-Living-Akola
अकोला

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महासत्संगात अ‍ॅड. कांचन शिंदे ठरल्या समन्वयाच्या दुवा!

अकोला : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संग कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग अकोला शाखेच्या प्रशिक्षक अ‍ॅड. कांचन शिंदे यांच्याकडे संचालनाची जबाबदारी होती. अ‍ॅड. कांचन शिंदे आणि यांनी हजारो प्रेक्षक आणि गुरुदेव यांच्यात योग्य समन्वय साधून त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संचालन केले.

त्यामुळे हजारो मराठी भाषिक असलेल्या या महासत्संगात श्री श्री रविशंकर यांच्या भावना मनामनांत पोहोचविणे अ‍ॅड. शिंदे यांच्या समन्वयामुळे सहज शक्य झाले.आर्ट ऑफ लिव्हिंग अकोला शाखेच्या वतीने आयोजित दिव्य महासत्संग भक्ती पर्वात अ‍ॅड. कांचन शिंदे यांनी भक्त कसा असावा, यासंदर्भात संपूर्ण जनसमुदायासोबत थेट संवाद साधला.

प.पू. श्री श्री रविशंकर यांनी यावेळी ईश्वराला शोधायला जायची गरज नाही, तुम्ही भक्ताला शोधा, कारण जिथे भक्त तिथेच ईश्वर, असल्याचे सांगितले. या भक्ती पर्वात अ‍ॅड. शिंदे यांनी समर्पक शब्दात ‘भक्ती’ शब्दाचे वर्णन केले. भक्ती हा शब्द चार अक्षरांनी बनला आहे.

भ, क, त, आणि इ, असा हा भक्ती शब्द प्रतीक आहे भरण पोषणाचे, जाणून घेण्याचे, तारण्याचे आणि शक्तीचे. याउलट जेव्हा मन एका विशिष्ट दिशेने वाहतं तेव्हा ती भक्ती असते आणि तीच सर्वात शक्तिशाली असते. अशीच ही भक्तीची लाट संपूर्ण महाराष्ट्रासह अकोल्यात श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगात अनुभवयास आल्याचे आपल्या संचालनात अकोला बार असोसिएशनच्या माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. कांचन शिंदे यांनी सांगितले.