ताज्या बातम्या मुंबई

आय आय टी मधील दलित विद्यार्थी आत्महत्येची सखोल चौकशी करावी – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि.15 फेब्रुवारी  – पवई येथील आय आय टी मधील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समिती द्वारे सखोल चौकशी करावी तसेच पुन्हा कोणताही  विद्यार्थी आत्महत्या करणार नाही याची आय आय टी प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे सांगत मयत दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या कुटुंबियांना आय आय टी ने सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

पवई येथील आय आय टी मधील दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केलेल्या दुर्घटनस्थळाची पाहणी ना.रामदास आठवले यांनी केली.यावेळी त्यांच्या समवेत रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस  अविनाश महातेकर ; रिपाइं चे स्थानिक ज्येष्ठ नेते  बाळ गरुड; सहाय्यक पोलीस आयुक्त  सूर्यवंशी; आय आय टी चे विविध अधिकारी उपस्थित होते.

पवई आय आय टी मध्ये दर्शन सोळंकी ची आत्महत्या झाली त्यापूर्वी सन 2014 मध्ये अंभोरे नावाच्या विद्यार्थ्याने आय आय टी पवईत आत्महत्या केली होती.याबाबत ना.रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून दलित विद्यर्थ्यांची आत्महत्या होणारे प्रकार थांबविण्यासाठी आय आय टी प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली.

ग्रामीण भागातून दलित मागासवर्गीय गरीब विद्यार्थी आय आय टी मध्ये प्रवेश घेतात त्यांची इंग्रजी भाषेवर पकड मजबूत करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आय आय टी मध्ये विशेष प्रशिक्षण वर्ग घेतला जातो.तसेच आय आय टी पवई मध्ये 2 हजार अनुसूचित जाती जमाती चे विद्यार्थी शिकत आहेत.

त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आय आय टी पवईत एस सी एस टी फोरम स्थापन केलेला आहे अशी माहिती आय आय टी प्रशासनाने दिली. मयत दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी यांचे त्यांच्या वडिलांशी बोलणे झाले होते. त्याला एका विषयाचा पेपर कठीण गेला होता.

त्यामुळे त्याच्या वडिलांनी दर्शन ला हिम्मत देऊन पुन्हा गावी अहमदाबाद गुजरात ला जाऊ मी येत आहे असा निरोप दिला होता.मात्र तरीही लगेच दर्शन सोळंकी ने आत्महत्या केली हे दुःखद आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात जातिवाद आहे की नाही की कोणते कारण आहे याचा शोध पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. त्यासाठी आपण उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती नेमून  दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.