क्राईम

आयजींचे पथकाचा बिजनेस सेंटर मध्ये छापा 40 लाखांच्या वर गुटखा केला जप्त

अकोला प्रतिनिधी :-3 मे च्या रात्री 9 वाजता दरम्यान  अकोला जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अकोला बिजनेस सेंटर येथे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने छापेमारी करून ४० लाखाच्यावर प्रतिबंधीत गुटखा ताब्यात घेतला आहे. जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या अकोला बिजनेस सेंटर येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अमरावती विशेष उपमहानिरीक्षक  यांच्या पथकाचे प्रमुख एपीआय निलेश देशमुख हे चार ते पाच दिवसापासून  अकोला शहरात ठाण मांडून होते.अखेर व3 मे रोजी शेजारील राज्यातून  HR-38-AB1579 क्रमांकाचा ट्रक प्रतिबंधीत असलेला 16चाकी रात्री 9 वाजता दरम्यान  अकोला  बिझनेस सेंटर येथे आला,याच वेळी दबा धरून बसलेल्या एपीआय देशमुख यांनी, ट्रक चालकाला ताब्यात घेऊन, गुटख्याने भरलेला ट्रकवर ताबा मिळविला, हा सर्व प्रकार त्या ठिकाणी हजर असलेले गोडाऊन मालक,ट्रक मधील गुटख्याच्या गोणी खाली करणारे आणि मालक घटना स्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाले. नमूद  ट्रकमध्ये वर टायर तर त्याखाली गुटख्याचे पोते होते. ट्रक मध्ये असणाऱ्या गुटख्याची किंमत ४० लाख रुपयांच्या वरअसून वाहनास हित कोटीच्या वर  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. रात्री उशिरा पर्यंत आणखी काही गोदामांची तपासणी सुरू होती. ही कारवाई चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक अजित देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्गावरील बिजनेस सेंटर येथे कारवाई केली.याच्या माहिती अकोला पोलीस दलाला मिळाल्यानंतर अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले,जुने शहर ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे,अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा हजर झाला होता,हेविशेष.