अकोला : ६० टक्के काम झालेल्या ६९ गावे पाणीपुरवठा याेजनेला पालकमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचा आरोप करीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी मुंबईत विधिमंडळ परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना कार्यकर्त्यांसह अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो शेतकऱ्यांसह शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमाेर आमदार नितीन देशमुख आंदोलन सुरू केले. ६० गावे पाणीपुरवठा याेजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली. या याेजनेची किंमत २१९ काेटी रुपये असून, प्रत्यक्ष याेजनेवर १९२ काेटी रुपये खर्च हाेणार आहेत. दरम्यान या योजनेवरील स्थगिती उठवावी अशी मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, राहुल कराळे, राजेश मिश्रा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.