ताज्या बातम्या देश

आदित्य ठाकरेंचं केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना पत्र

महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्द लक्ष देण्याच्या केल्या सूचना

केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केल आहे.तसच मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे.

पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाल आहे, कारण जमिनीवर कोणतीही कारवाई होत नाही.

@mybmc ची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्सची कृती ही केवळ त्याच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी विलंब असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे