In view of the upcoming elections, women should become more active and start working – Chhagan Bhujbal
राजकीय

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रिय होऊन कामाला लागावे – छगन भुजबळ

नाशिक,दि.२५फेब्रुवारी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रीय होऊन कामाला लागावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महिला पदाधिकाऱ्यांना केल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नाशिक शहर महिला अध्यक्षपदी योगिता आहेर तर युवती शहराध्यक्षपदी ऐश्वर्या गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन अध्यक्षांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी छगन भुजबळ यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम खा.शरदचंद्र पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात महिलांना सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे. नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खा.शरदचंद्र पवार यांचे विचार, धेय्य धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्य द्यावे. निवडणुकीत महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याने इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवून काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या कधीही लागू शकता त्यामुळे आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. त्यादृष्टीने नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारिणी लवकरात लवकर तयार करावी. यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथांच्या महिलांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी तयार करण्यात येऊन कामाला लागावे अशा सूचना त्यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना केल्या.