अकोला

आगामी नगर परिषद निवडणूक काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढविणार -जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर

अब्दुल गनी अजमेरी व जादूगर अशरफ भाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

मूर्तिजापूर : नगर परिषद च्या होऊ घातलेल्या निवडणूक संदर्भात काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती धाम मंदिर मूर्तिजापूर येथे दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी कार्यकर्ता /पदाधिकारी आढावा बैठक पार पडली.

सदर बैठक मध्ये उपस्थित पक्षाचे जेष्ठ पदस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आगामी नगर परिषद निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली.गटबाजीचे राजकारण बाजूला सारून सत्ता काबीज करणे हे ध्येय समोर ठेऊन व पक्ष बळकटी साठी सर्वांनी मिळून मिसळून कार्य करावे असे जिल्हा कार्याध्यक्ष महेश गनगणे यांनी व्यक्त केले तसेच जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येतील यावर भर देऊन काम करणे गरजेचे असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश भारती यांनी आपले मत मांडले.

यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी आगामी नगर परिषद निवडणूक ही वार्ड निहाय नियोजन करून इंच-इंच लढून नागरिकांना सुराज्य सुशासन देण्याचा प्रयत्न करू असे जिल्हाध्यक्ष यांनी निवडणूक आढावा बैठक मध्ये सांगितले.यादरम्यान अब्दुल गनी अजमेरी व अशरफ जादूगर यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला.

उपस्थित मान्यवराचे हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर ,कार्याध्यक्ष राजेश भारती, कार्याध्यक्ष महेश गनगणे, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, जिल्हा सरचिटणीस बंडू भाऊ डाखोरे, प्रदेश संघटक अशोक दुबे, शहर अध्यक्ष दिनेश दुबे, तालुक कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, शहर कार्याध्यक्ष रोहित सोळंके, डॉ विजय वानखडे, शहाबुद्दीन, सुनील वानखडे,दिपक खंडारे, दुर्गाताई मोहिते, भारत जेठवानी नगरसेवक ,विनोद बंग ,जय रावत ,संदीप खंडारे ,एड भारत जमादार , रहमान शाह , वसीम भाई मधुकर पुनसे , मो,शहाबुद्दीन , सगीर भाई जलील भाई दुर्गा ताई मोहिते, अब्दुल वहीद भाई शेख कलीम भाई इरफान भाई यांच्या सह असंख्य कार्यकर्ते बैठकिला उपस्थित होते.