अकोला

आई-वडीलांचा वाढदिवस वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन देऊन साजरा

मूर्तिजापूर : केक कापून, डीजे वाजवून, फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करणाऱ्या काळात मुलाने आपल्या आई-वडीलांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांसमवेत मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेऊन मुलांनी साजरा केला व समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ सादर केला.

येथील रेल्वे कर्मचारी सुनिल तायडे आपल्या शासकीय सेवे व्यतिरिक्त सतत सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त असतात, हाच वसा पुढे नेत त्यांनी आपल्या आई, वडीलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पुंडलिक नगरातील परमहंस संत पुंडलिक महाराज मंदिरसमोरील वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधून त्यांना भोजन दिले.

नितीन तायडे,सुनिल तायडे, सचिन तायडे यांच्यामातोश्री सिंधुताई व पिताश्री सुभाषराव यांचा अनुक्रमे काल व आज वाढदिवस आहे. प्रसिद्धीपराड्ःमुख व्यक्तित्व असणाऱ्या आपल्या आई वडीलांच्या भावनांचा आदर करत त्यांनी वृद्धाश्रमातील निराधारांना मायेची वागणूक देत आपलेपणाची जाणीव करून दिली. त्यांच्या उपस्थितीत आई वडीलांचा वाढदिवास साजरा केला. व त्यांच्यासमवेत मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला.

विशेष म्हणजे सुनिल तायडे यांच्या रेल्वेतील सेवेला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल त्यांचाही ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे, वृद्धाश्रम संचालक प्रमोद अवघाते, पत्रकार अर्जुन बल‌खंडे, पत्रकार अजय प्रभे, आमोल रामटेके, एकनाथ मेश्राम, संजय नाईक, विनोद इंगळे, शामराव बोरकर, विजय खैरे, आनंद बलखंडे, सुरेश डोंगरे, देवानंद तायडे, धिरज साळुंके, सीमांत चव्हान, सचिन तायडे व इतरांनी सत्कार केला.