कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल! कोल्हापूर ऑन लाईन:-२८ऑगस्ट२०१७रोजी अतिशय निर्घृणपणे, स्वतःच्या जन्मदातीचा खून करून आईच्या शरीराचे तुकडे तुकडे करून आईचं काळीज तव्यावर तेलात तळून खाणाऱ्या नराधामाला कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या खुनाचा तपास करीत असलेल्या पोलिसांनी खुन्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठीDNA या तंत्रज्ञानाचा वापर केला.याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,२८ऑगस्ट२०१७रोजी कोल्हापूरातील माकडवाला कॉलनी मध्ये सुनील कोचीकोरवी याने त्याचा आईचा खून करून मृतदेहाचे तुकडे तुकडे केले होते. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आईचं काळीज काढून त्याने तव्यावर तेलात तळून, त्याला तिखट मीठ लावून खाल्ले होते. असे या खुनाचा तपास करणारे पोलीस अधिकारी संजय मोरी यांनी एका दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चूक राहू नये यासाठी DNA तंत्राचाही वापर केला होता. अशी माहिती त्यांनी दिली.मोरे म्हणाले, “घटना कळताच आम्ही माकडवाला वसाहतीत गेलो. जमावाने आरोपीला पकडले होते. ज्या घरात खून झाला तिथली दृश्य फारच भयानक होती. मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे करून ते बाजूला ठेवले होते. किचनमधील दृश्य तर आणखीन भयानक होतं. तिथं तव्यावर काळीज तळलेलं दिसून आलं. या काळजाचा काही भाग गायब होता. त्यातून आम्हाला शंका आली की या आरोपीने ते खाल्लं असावं.”भक्कम असे पुरावे गोळा करणे हे पोलिसांसमोरील आव्हान होतं. शिवाय आरोपी हा विकृत आहे, हा गुन्हा माणुसकीला काळिमा फासणारा दुर्मिळातील दुर्मिळ आहे हे न्यायालयात सिद्ध होणं आवश्यक होतं. त्यामुळे पोलिसांनी DNA तंत्राचा वापर पोलिसांनी केला.आरोपीच्या अंगावर लागलेले रक्त बॉडीवॉशने गोळ्या करण्यात आले. तसेच नखातील रक्त ही गोळा करण्यात आले. आरोपीने खून केल्यानंतर आईचं काळीज खाल्लं होतं हे सिद्ध करणं आवश्यक होतं. त्यासाटी Stomach Wash डॉक्टरांच्या मदतीने घेण्यात आला. (Stomach Wash म्हणजे उलटी करायला लावून पोटातील घटक गोळा करणे). या सर्व नमुने पुण्यात DNA चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, या चाचणीतील DNA हा मृतदेहाच्या DNAशी मॅच करण्यात आला.पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुचकता दाखवल्याने या नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवणे शक्य झाले