science exhibition
महाराष्ट्र

आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि कोविड पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली दीड लाखाची रोख बक्षिसे

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि कोविड पोस्टर् स्पर्धा नुकतीच रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडली. या प्रदर्शनाला तब्बल ४० हजार विद्याथ्र्यांनी भेट दिली. विजेत्या स्पर्धकांना दीड लाखाची रोख बक्षिसे देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे . दरवर्षी अंदाजे २५ हजाराहुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात. यावर्षी ४० हजाराहुन अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. विजेत्या शाळांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. या वर्षी ५० हुन जास्त शाळा सहभागी झाल्या होत्या. तसेच मुलींचा रोप मल्लखांब तर मुलांचा पोल मल्लखांब याची प्रात्यक्षिके हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. बक्षीस समारंभासाठी वस्तू आणि सेवा कर GST विभागाच्या उप आयुक्त रुपमनेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. संतोष डावखर आणि त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेऊन प्रदर्शन यशस्वी केले आहे.

सायन्स प्रदर्शन ५ वी ते ७ वी गटात होली रोज स्कूल टिटवाळा, डी एन सी स्कुल डोंबिवली, सिद्धार्थ विद्यालय कल्याण, बी टी गायकवाड स्कुल कल्याण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. तर ८ वी ते १० वी गटात ओंकार इंग्लीश स्कुल डोंबिवली व शंकरा विद्यालय डोंबिवली प्रथम क्रमांक विभागून, कोटकर विद्यालय डोंबिवली व साई इंग्लीश स्कुल कल्याण द्वितीय क्रमांक विभागून, अचिव्हर्स स्कुल कल्याण तृतीय क्रमांक, पाटकर विद्यालय डोंबिवली यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. तसेच पोस्टर स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटात वैष्णवी नलावडे साई स्कुल कल्याण, अविनाश राणे  St. मेरी स्कुल कल्याण, राजीव फडीकर मढवी स्कुल डोंबिवली यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक मिळाला आहे. ८ वी ते १० वी गटात प्रथम सुवर्णा जाधव गायकवाड स्कुल कल्याण, द्वितीय श्रावणी इंगळे कोटकर विद्यालय कल्याण, तृतीय क्रमांक सान्वी भट्ट ओंकार केब्रिज स्कुल डोंबिवली यांनी पटकावला आहे. बेस्ट प्रेसेंटर म्हणून हर्षित भानुशाली गांधी स्कुल कल्याण व सप्तपरणी सन्याल st. जॉन स्कुल डोंबिवली यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.