All India Congress Committee
अमरावती

अ.भा. काँग्रेस समितीवर महाराष्ट्रातून तब्बल १०० सदस्यांची निवड

अमरावती, 21 फेब्रुवारी : महाराष्ट्रातून अखिल भारतीय काँग्रेस समितीवर २५ स्वीकृत सदस्यांसह शंभर सदस्यांना घेण्यात आले आहे. राज्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसचे राजकारण करणाऱ्या ज्येष्ठांना परत स्थान मिळाले आहे.

नेतेपुत्र आहेच, त्यात लातूरच्या देशमुख बंधूंसह नागपूरचे कुणाल नितीन राऊत पण आहेत. सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या पण आहेच.स्वीकृत सदस्यांमध्ये प्रामुख्याने अनिस अहमद, प्रमोद मोरे, देवानंद पवार, संध्या सव्वालाखे, गणेश पाटील, वजाहत मिर्झा, अभिजित सपकाळ, प्रफ्फुल गुडध्ये पाटील, नितीन कुंभलकर नामदेव उसेंडी, विलास औताडे व अन्य आहेत.

तर निवडून आलेल्या सदस्यात रणजित देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, पृथ्वीराज चव्हाण,नितीन राऊत, अंमर काळे, रणजित कांबळे, मुकुल वासनिक, अविनाश पांडे आदी नेत्यांचाही समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातून पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामध्ये माजी पालकमंत्री आ.यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भैया पवार, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा समावेश आहे.