अहमदनगर, 25 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इथेनॉलच्या टाकीला आग लागल्याने ही स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या स्फोटात अनेकजणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. इथेनॉलच्या प्लांटला आग लागल्यानंतर बॉयलरला देखील आग लागली. येथे असलेल्या रसाच्या टाक्या देखील फुटल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्यावेळी कारखान्यात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या कमी पडत असल्याचे माहिती पुढे आलीय.