वर्धा १३ जानेवारी:-अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी, वर्धा जिल्ह्यात एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.डॉ रेखा कदम असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टराचे नांव आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी या तालुक्याची ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी या तालुक्याच्या ठिकाणी डॉ रेखा कदम यांचे खाजगी हॉस्पिटल आहे.या हॉस्पिटलच्या लागून असलेल्या गोबर गॅसच्या टाक्यात ११कवट्या आणि५४हाडं ते ५४ सापडल्याने खळबळ उडाली आहे.तसेच याच ठिकाणी रक्ताने माखलेले कपडे आणि गर्भपिशव्या सापडल्याने, डॉ रेखा नीरज कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये अवैधपणे गर्भपात होत असल्याची शक्यता वर्तीविल्या जात आहे. या प्रकरणी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ रेखा नीरज कदम यांना १३डिसेंबर२०२२रोजी अटक करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने केले होते. त्यामधून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती.तिचे पोट दुखू लागल्याने,तिला डॉ रेखा कदम यांच्याकडे तपासणी साठी दाखल करण्यात आले. तपासणी अहवाल आल्यावर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झालं.मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे मुलीची आणि कुटुंबाची बदनामी होऊ नये यासाठी आरोपी मुलाचे आईवडील आणि पीडित मुलीच्या आईवडिलांनी तिचा अवैध गर्भपात करण्यासाठी डॉ रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तिचा३०हजार रुपये घेऊन गर्भपात करण्याचे डॉ रेखा कदम यांनी कबूल करून, ६जानेवारी २०२२रोजी गर्भपात करण्यात आला.गर्भपात करण्यापूर्वी या प्रकाराची माहिती पोलिसांना देने बंधनकारक असूनही, ही माहितीडॉक्टरांनी पोलिसांपासून लपविण्याचा उद्देश काय होता, याचा सुद्धा पोलीस घेत आहेत.या प्रकरणी वर्धा पोलिसांनी डॉ रेखा कदम यांच्यासह डॉक्टर कदम यांच्या सासू,नर्स, मुलाच्या आईवडिलांना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींवर३७६(३)३७६(२)(एन)३१२,३१३,३१५,३४१,२०१,५०६,३४नुसार सहकलम४,६,२१,(१)पास्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.