विदर्भ

अवास्तव व अन्यायकारक वीजबिल वसुली बंद करून ग्राहकांची विज खंडीत करू नये – शेतकरी जागर मंच

सुनील जैन
बोरगाव(मंजू)२२ऑगस्ट :-    महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने करोना काळातील वीजबिल दिल्ली सरकारच्या धर्तीवर दरमहा २०० युनिट प्रमाणे माफ करायला पाहीजे होते.
ते माफ न करता उलट अन्यायकारक बे हिशोबी अव्वाच्यासव्वा रक्कमेचे बिले ग्राहकांना देऊन सरकारची न जुमानता सक्तिची वसुली विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावा गावात चालू केली. एकीकडे सरकारने कोरोना काळात ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमुजरांना दोन‌ वेळेचे व्यवस्थित जेवण मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्याचा वाटप कोरोना काळात केला पण वीज वितरण कंपनी मात्र याच काळात अन्यायकारक व अवास्तव विजबिले देऊन त्यांना धमकावून सक्तीची वसुली करण्याचा अट्टाहास करते आहे. यावर शेतकरी जागर मंचाचे जिल्हा संयोजक शेतकरी नेते मा.मनोज तायडे यांनी गावात आलेल्या वीज वितरण कंपनीचे एस.डी.ओ केनेकर  व शाखा अभियंता हेमलता पाटील यांना वीज खंडीत करतांना ” आम्ही वीजबिल भरायला तयार आहोत पण कोरोनाकाळातील दिलेल्या अव्वाच्या सव्वा बिलामुळे ग्राहकांची लूट होत आहे,ती लूट न करता ग्राहकांना वास्तव वीजबिलाची आकारणी करून वीज बिलाची वसुली ग्रामीण भागात सोयाबीन‌ हंगाम येईपर्यंत करू नये अशी मागणी करत असे आदेश ही स्वता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि ऊर्जामंत्री  नितीनजी राऊत यांनी दिले असतांनाही ही विज वितरण कंपनी ची सक्तिची वसुली का ? असा सवाल निवेदन कर्त्यांनी केला.विज कंपनीने आकारलेली अवास्तव बिलाची रक्कम कमी करून विद्युत पुरवठा खंडीत करणे अजिबात न्यायसगंत होणार नाही.असेही शेतकरी जागर मचाच्या निवेदन कर्त्यांनी म्हटले आहे,तसेच वीजबिला संदर्भात गावागावातील वीज ग्राहक समिती सोबत चर्चा करून वीजबिलाचा गुंता सामोपचाराने सुटेल अशी कारवाई करून गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित घटनाक्रम होणार नाही याची दक्षता घेऊन ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी जागर मंचातर्फे बोरगाव मंजू येथील विज वितरण कंपनीच्या अभियंता कार्यालयात करण्यात आली.यावेळी कौलखेड , बहाद्दरपूर , पळसो , खडका , ताणखेड , पैलपाडा व अन्वी मिर्झापूर या गावातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते‌. हे निवेदन‌ देत असतांना मा.सर्वश्री. मनोज तायडे , ज्ञानेश्वर वर्गे , नंदु चौधरी , शरद  देशमुख , विजय नागे , राजु बढे , विनोद गावंडे , मिनाताई तायडे , अमोल तायडे , पुरुषोत्तम खरड, अमोल महल्ले , अरुण तायडे , भुषण तायडे , अनिल खरड , रोहित तायडे , अंबादास तायडे , दादाराव तायडे , प्रविण तायडे , राजकुमार हेटे , राजु देवगडे , अभय तायडे , प्रशांत नागे इ.ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते