अकोला

अवकाळी पावसाने गहू पिकाचे नुकसान शेतकर्‍यांचा काढणीवर आलेला गहू झोपला

अकोट: तालुक्यातील आकोलखेड,आकोली जहाँगीर,अंबोडा,दहिखेल फुटकर,पोपटखेड शेतशिवारात ता.१५ मार्च रोजी रात्री पडलेल्या पावसाने गव्हाचे पिक हे काढणीवर आले असताना अवकाळी पावसाने गहू झोपला आहे.त्यामुळे शेतकर्‍यांना मोठी आशा गहू उत्पादनातून त्यापासून सुध्दा पावसाने हातचे पिक उध्वस्त झाले आहे.

गव्हाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत.शेतकरी मोठ्या आशेने गव्हाच्या पिकाकडे बघत होता.परंतू रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने गहू झोपला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.दुष्काळाची शेतकर्‍यांना सरकारकडून नुकसान भरपाई सुध्दा अजून पर्यंत मिळाली नाही.त्यातचं शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी जेणेकरून शेतकरी निराशेतून बाहेर पडेल.

गहू हा जीवन जगण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक असून गव्हाचे झालेले नुकसान हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने निराशा आहे. -ललित नगराळ

अवकाळी पावसाने काढणीवर आलेल्या गव्हाला झोपून टाकल्याने हाती आलेले पिकाचे नुकसान झाले आहे. -संदिप देऊळकर,शेतकरा