विद्यार्थिनीवर वर्गात कुकर्म करणाऱ्या गुरुजींना, गावकऱ्यांकडून चोप!
यवतमाळ; वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गातच अल्पवयीन विद्यार्थीनीवर कुकर्म करणाऱ्या गुरुजींना,गावकऱ्यांकडून चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे, याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, अल्पवयीन विद्यार्थी नीला शिकवणीच्या नावाखाली शाळेत बोलावून,वर्गातच तिच्यावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास कुकर्म करतांना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्याची कपडे काढून धुलाई केल्याची माहिती मिळाली .गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना यवतमाळ तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे.विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा अरुण राठोड (वय ५५ रा. जवळा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो बेलोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे.एका अल्पवयीन विद्यार्थ्यीनीला तुला चांगलं शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार करत होता.शाळा बंद असतानाही तो अतिरिक्त वर्ग घेत होता. रविवारी सुद्धा हा शिक्षक शाळेत दिसत असल्याने वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. शनिवारी दुपारी शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी अचानक धडक दिली.तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्यांनी दिसले. संताप अनावर झाल्याने ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला तसेच त्याची दुचाकीसुद्धा पेटवून दिली.दरम्यान घटनेची माहिती पोलिस पाटलांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार किशोर जुनगरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार हे आपल्या पथकासह बेलोरा येथे पोहोचले.संतप्त असलेले ग्रामस्थ शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. परिस्थिती पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून अरुण राठोडची जमावाच्या तावडीतून सुटका केली.विद्यार्थिनी व शिक्षकास यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पीडित मुलीच्या आई-वडिलांशी चर्चा केली.वडिलांच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला