क्राईम

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला तुरुंगवास!

अकोट प्रतिनिधी३०ऑगस्ट:-अकोट सत्र न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी,२१वर्षीय तरुणास १० वर्षे सश्रम तुरुंगवास आणि १५हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, दंड न भरल्यास एक वर्षे अधिक तुरुंगवास भरावा लागेल.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५जून २०१८रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान, ६व्या वर्गात शिकणाऱ्या, एका अल्पवयीन मुलीवर सागर दिपक लबडे,वय२१वर्षे, रा.अकोट याने अल्पवयीन मुलीचे आईवडील शेतात,बहीण भाऊ घरात होते.आणि पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या दारात उभी असतांना, आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून, सागर लबडे याने त्या मुलीचा हात ओढून, बळजबरीने त्याच्या घरात नेऊन, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.पीडित मुलीने तिचे आईवडील शेतावरुन घरी आल्यानंतर,तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची संपूर्ण कहाणी आईवडिलांना सांगितल्यावर,त्याच दिवशी अकोट शहर पोलीस ठाण्यात,घडलेल्या प्रसंगाची तक्रार दाखल केली होती.अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सागर दिपक लबडे याच्या विरोधात अपराध क्रमांक२९४/२०१८ कलम३७६(३)सहकलम३व४नुसार गुन्हा दाखल करून आरोपिला अटक करण्यात आली होती.हा खटला अकोला सुरू असतांना न्यायालयाने ८साक्षीदार तपासले, सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाची बाजू ऐकून, आरोपी सागर दिपक लबडे याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले. त्यावरून अकोट सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपिला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम२०१२च्या कलम३सह४सह१८ कलमा अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्याकरिता आरोपीस स्वतंत्र वेगळी शिक्षा न देता,बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण २०१२ अधियम४२ भादवीच्या३७६(३)५११नुसार १० वर्षे तुरुंगवास आणि १५हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, नमूद दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे,न्यायालयाने ,आदेशात नमूद केले. तसेच पीडित मुलीला समाजकल्याण विभागाकडून मदत मिळवुन देण्यासाठी, प्रकरण समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शुभांगी कोरडे(दिवेकर)यांनी करून, दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.या खटल्यात सरकार तर्फे सरकारी वकील ऍडअजित देशमुख यांनी युक्तिवाद केला.