देश

अल्पवयीन मुलीच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवल्यास पास्कोचा गुन्हा नाही!

कोलकाता, २३सप्टेंबर: एखाद्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवणे हा लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पास्को अंतर्गत गुन्हा नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा, कोलकाता उच्च न्यायालयाने दिला.

न्यायालयाने दिलेल्या निकालात एखाद्या१६वर्षीय मुलीने एखाद्या मुलासोबत स्वतःच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवले,आणि संबंध ठेवत असतांना होणाऱ्या परिणामांची जाणीव तिला असेल, तर ती अजान आहे असा समज करणं चुकीचे ठरेल, अस मत न्यायालयाने नोंदविले.

आणि अशाप्रकारे गुन्हा दाखल असलेल्या मुलाची कोलकाता न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.एका २२ वर्षाच्या मुलाने १६ वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्या मुलावर आयपीसी कलम ३७६(१) आणि पोक्सो कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यावर त्या मुलाने कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये सांगितलं होतं की, गुन्हा ज्यावेळी घडला अशी नोंद करण्यात आली होती त्यावेळी संशयित हा अल्पवयीन होता आणि त्या मुलीच्या संगनमताने त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते.

या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य म्हणाले की, “जर एखाद्या पुरुषाने अल्पवयीन मुलीशी संगनमताने शारीरिक संबंध ठेवले तर केवळ पुरुषाला जबाबदार धरता येणार नाही.”ही घटना २०१७ सालची असून त्यावेळी २२वर्षाच्या संशयितावर एका १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या केसमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांनीही संगनमताने शारीरिक संबंध ठेवल्याने केवळ मुलाला दोषी मानता येणार नाही असा निर्णय देत उच्च न्यायालयाने संबंधित मुलाची निर्दोष मुक्तता केली.