क्राईम

अल्पवयीन मतिमंद मुलीवर नात्यातील व्यक्ती कडून बलात्कार!

ठाणे१३सप्टेंबर:-मुबंईतील साकिनाका परिसरातील एका महिलेवर बलात्कार करून,तीची हत्त्या केल्याची घटना ताजी असतांनाच,ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात १६वर्षीय अल्पवयीन मुलीवर, नात्यातील व्यक्तीनेच बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एका१६वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर,तिच्या नात्यातील व्यक्तीने बलात्कार करून, नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना१०सप्टेंबरला शुक्रवारी घडली,घडलेला प्रकार मतिमंद मुलीने आईवडिलांना सांगिल्यावर आईवडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन,तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण कायदा पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून,४८वर्षीय नाराधामस पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. पुढील तपास भिवंडी पोलीस करीत आहेत.