अमरावती

अमरावती – 16 व 17 मार्चला ग्रामीण डाकसेवा राहणार बंद

अमरावती : ग्रामीण डाक सेवकांनी प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात १६ व १७ मार्चला दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असल्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील ४०० ग्रामीण डाक शाखा बंद राहणार आहेत.

२० फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. जीडीएस समितीची शिफारस लागू करून अतिरिक्त वेतन वृद्धी देणे, टारगेट देऊन जीडीएसची मानसिकता व शारीरिक प्रताडना थांबविणे, विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर आदेश व धमक्या देणे बंद करणे, जीडीएस कर्मचाऱ्यांच्या सुट्टी दरम्यान बदली कर्मचारी लावण्याची अनुमती देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या दोन दिवसीय आंदोलन दरम्यान राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचे डॉ डाक विभागातील कामकाज पूर्णतः ठप्प होईल. शत प्रतिशत कामगारांना या दोन दिवसीय आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे’ आवाहन एम. के. काजी, विजय रिठे, सुनील तळकीत, जे. जे. नांदुरकर, एस. आर. अडगोकार, एस. जी. चौधरी यांनी केले आहे.