अमरावती

अमरावती – मुंबई अंबा एक्स्प्रेसला जून पासून राहणार स्लीपर कोचचे केवळ दोन डबे

अमरावती, 23 फेब्रुवारी : अमरावतीकरांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या अमरावती – मुंबई अंबा एक्सप्रेसमधील साधारण स्लीपर कोच चे डबे कमी करून त्या जागी वातानुकूलित डब्बे लावण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. जूनपासून स्लिपर डब्यांची संख्या घटवून ती केवळ दोनवर आणली जाणार आहे त्या बदल्यात एसी डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध होण्यास सुरुवात झाली असून आज महानगर यात्री संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा यांच्या नेतृत्वात स्टेशन प्रबंधक याना एक निवेदन देण्यात आले आहे.

अमरावती – मुंबई अंबा एक्सप्रेस सुरु झाल्यापासून या गाडीला प्रचंड असा प्रतिसाद रेल्वे प्रवाशांकडून मिळत आला आहे या गाडीचे आरक्षण हि नेहमीच फुल्ल असते सर्वसामान्य नागरिक, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांसाठी ही एक्स्प्रेस अतिशय सोयीची मानली जाते.

सुरुवातीपासूनच या एक्सप्रेसला स्लिपरचे ९ तर एसी तृतीयचे चार बोगी आहेत. याशिवाय जनरल व एसी प्रथम, द्वितीय श्रेणीच्या बोगी जोडल्या आहेत. मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून स्लीपरच्या ९ डबे कमी करून ते दोनवर आणण्याचा निर्णय झाला आहे. विशेष 5 म्हणजे वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या डब्यांची संख्या चार वरून तब्बल १० केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना

याचा फटका बसणार आहे. एसी डब्यांमध्ये प्रवास करणारा वर्ग वेगळा आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रवासाला ब्रेक लावण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय त्वरित रद्द करावा रेल्वे प्रशासनाला वाटत असेल तर अमरावती- मुंबईकरिता स्वतंत्र एसी रेल्वे सुरू करावी, मात्र सद्यःस्थितीत सर्वसामान्यांसाठी सोयीच्या असलेल्या कोचच्या शेड्युलमध्ये बदल करता कामा नये. स्लिपरचे कोच घटविले आणि एसीचे वाढविल्यास सर्वसामान्य कसे प्रवास करतील, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा अशी मागणी महानगर यात्री संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा यांनी केली आहे

निर्णय झालेला आहे

मध्यरेल्वे भुसावळ मंडळाकडून जूनपासून स्लिपर कोचची संख्या घटवून एसी डब्ब्यांची संख्या वाढविण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

– डी.के. राऊत, उपस्टेशन प्रबंधक, • अमरावती मॉडेल रेल्वेस्टेशन.