अमरावती

अमरावतीत सहा खरेदी विक्री संघांत निवडणुकीचा बिगुल वाजला

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तीन खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेनंतर आता सहा खरेदी विक्री संघात निवडणुकीची प्रक्रिया उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली आहे.

या संघाकडून मतदार यादीकरिता प्रतिनिधी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याकरिता ६ एप्रिलपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सोसायटींच्या सहाव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. ज्या सोसायटी, खरेदी विक्री, पंतसंस्था, बँकांची मुदत संपली आहे. त्या सर्व सहकार क्षेत्रातील निवडणुका आता सहाव्या टप्यात पूर्ण करण्याचे आदेश सहकारी प्राधिकरणाने दिले आहे. त्यामुळे यापूर्वी तीन खरेदी विक्री संघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली.