अमरावती

अमरावतीत संस्कार भारतीच्या पाडवा पहाटचे आयोजन

अमरावती, 20 मार्च : मराठी नववर्षाचे स्वागत करण्याकरिता संस्कार भारती अमरावतीच्या वतीने २२ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता व्यंकटेश लॉन, बडनेरा मार्ग येथे पाडवा पहाटचे आयोजन केले आहे.

यात संगीत, नृत्य, नाट्य व रंगावली इत्यादी सर्व विधांचे १०० पेक्षा अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने अमरावती संस्कार भारतीच्या वतीने करण्यात येत आहे .आपणा सर्वांच्या भरघोस उपस्थितीत या मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करूया.

नूतन वर्षाच्या स्वागताकरिता व्यंकटेश लॉन ,बडनेरा मार्ग येथे पहाटे ५.१५ वाजता बहुसंख्येने आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष संस्कारभारतीच्या वतीने करण्यात येत आहे.