महाराष्ट्र

अपघाती मृत्यू रोखण्यासाठी दुचाकी स्वारांना हेल्मेटसक्ती!

नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती

 

नासिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांचा महत्त्वपूर्ण  निर्णय

नासिक५सप्टेंबर:-नासिक जिल्ह्यात एका महिन्यात दुचाकी अपघातात एकाच महिन्यात९जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.एकाच महिन्यात घडलेल्या दुचाकी अपघातात बळी गेलेल्या, एकाही दुचाकी स्वाराने हेल्मेट न घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे नासिक शहर पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी अपघाती मृत्यू रोखण्यासाठी येत्या गुरुवार पासून नासिक मध्ये दुचाकी चालविणाऱ्यासाठी हेल्मेट सक्ती केली आहे.नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले. मात्र, हेल्मेटधारकांनी या मोहिमेलाही फाटा दिला. फक्त पेट्रोल घेण्यापुरते पेट्रोल पंपावरच हेल्मेट घालणे सुरू केले आहे. हे चित्र पाहता येत्या गुरुवारपासून हेल्मेट सक्ती मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. या टप्प्यात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.नासिकमध्ये  अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता, हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील लोकांची जबाबदारीची भान ठेवून, विना हेल्मेट दुचाकी चालवू नये,डोक्यावर हेल्मेट घालूणच प्रवास करावा,जे हेल्मेट घालून दुचाकी चालविणार नाहीत,त्यांचे वाहतूक केंद्रावर नेऊन समुपदेशन करण्यात येईल, असं आव्हान नासिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी केले आहे.