अकोला

…अन् पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

अजय प्रभे मूर्तिजापूर,ता.२१ : शहरातील एका डॉक्टरने आपल्या सेवाभावी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले असून याप्रकरणातील फिर्यादीने फिर्याद देण्यास नकार दिल्यामुळे सदर डॉक्टरला अभय मिळाल्याची सर्वत्र चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वीचा हा प्रकार असून पिडीत अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (ता.१९) शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असतांनाच सदर मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर फिर्याद दाखल करण्याचा निर्णय मुलीने मागे घेतला व पॉस्को अंतर्गत दाखल होणारा गुन्हा दाखल होऊ शकला नाही. सदर डॉक्टर वर यापूर्वीच्या अशाच एका प्रकरणात न्यायालयात खटला सुरू असल्याचे समजते. काही समाजधुरीणांनी डॉक्टरला चांगलीच समज दिली असून तो आता वैद्यकीय व्यवसाय करणार नसल्याचेही समजते.
——
तक्रार दाखल करायची नसल्याचा मानस संबंधित मुलीने लेखी स्वरूपात व्यक्त केला असून तक्रारकर्ता तक्रार द्यायच्या मनस्थितीत नसेल, तर आम्ही काही करू शकत नाही.
-श्री.सोळंके, ठाणेदार, मूर्तिजापूर.