क्राईम

अनोळखी इसमाचा रेल्वेने कटुन मृत्यु 

अजय प्रभे
मूर्तिजापूर प्रतिनिधी३०ऑगस्ट – ३०ऑगस्ट रोजी मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरात कलकत्ता कडे जाणाऱ्या रेल्वे लाईनवर   अंदाजे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेच्या खाली येऊन कटुन मृत्य झाल्याची घटना सकाळी ६.३०च्या दरम्यान रेल्वे लाईन वर घडली.
  प्राप्त माहितीनुसार रेल्वे विभागात कार्यरत ट्रक मॅन समीर यांना रेल्वे लाईन वर मृत देह दिसल्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक राजू जळमकर यांना दिली, त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल तायडे, वाटाणे हे घटनास्थळी जाऊन  यांनी पंचनामा केला असता, सदर अनोळखी इसमाचा चेहरा छिन्न विच्छिन्न झालेल्या अवस्थेत दिसला असून त्याच्या हातावर (नई)व त्रिशूलचे निशाण गोंदलेला असून अंगात निळ्या रंगाचे बनियान, भुरकट काथ्या रंगाचे अंडरवीयर, काळसर रंगाचे फुल पॅन्ट,कंबरेला लाल-काळा रंगाचा करदोडा आहे,वरील  वर्णनाचा अनोळखी इसम कि.मी.६२९/पोल १६/ १८ च्या जवळ कटल्याने मृत्यू झाल्यावरून सदर प्रकरणी १७४ सी आर पी सी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास मूर्तिजापूर रेल्वे पोलीस करीत आहे.